सलग पाचव्यांदा आरबीआयकडून रेपो दरात 0.25 टक्क्यांनी घट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) नागरिकांना मोठी भेट देण्यात आली आहे. आरबीआयने रेपो दरात पुन्हा एकदा कपात (RBI repo rate cut) केली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत.

सलग पाचव्यांदा आरबीआयकडून रेपो दरात 0.25 टक्क्यांनी घट

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) नागरिकांना मोठी भेट देण्यात आली आहे. आरबीआयने रेपो दरात पुन्हा एकदा कपात (RBI repo rate cut) केली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत. यंदा रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.15 झाला आहे. याआधी रेपो दर 5.40 होता. सलग पाचव्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात (RBI repo rate cut) केली आहे.

नुकतेच ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात घट केली होती. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा झाला होता. आता पुन्हा एकदा घट केल्यामुळे नागरिकांना घर किंवा वाहन हाफ्ता कमी पडणार आहे.

आरबीआयने सलग पाचव्यांदा रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. रेपो दरात कपात केल्याने रिव्हर्स रेपो दरातही कपात होते. यापूर्वीच्या चार बैठकांमध्ये आरबीआयने रेपो दरात कपात केली होती. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग पाचव्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता, त्यांच्या जागी शक्तीकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सलग पाच वेळा रेपो दरात कपात झाली.

तुम्हाला फायदा काय?

रेपो दरात कपात केल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होतो. आरबीआयने व्याजदर कपात केल्यामुळे बँकांवरही व्याजदर कपातीसाठी दबाव असेल. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारखेंचे हप्ते कमी होतील.

रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर किंवा रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने पैसा घेते तो दर. रेपो दर वाढल्यास, बँकांना रिझर्व्ह बँकांना वाढीव व्याजदराने पैसे द्यावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून बँक आपल्या कर्जदारांचं व्याजदर वाढवते. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यास, बँकाही आपल्या कर्जदारांचं व्याजदर कमी करतात. रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. त्यामुळे बँका कर्जदारांना पैसे देताना कमी दरात देऊ शकतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *