शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एक वर्षाचा तुरुंगवास

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्यात पोलिस शिपाई जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कामिनी …

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एक वर्षाचा तुरुंगवास

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्यात पोलिस शिपाई जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

कामिनी शेवाळे या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी असून, त्या स्वत: शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत.

2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान चेंबुरजवळील तुर्भे येथे पैसे वाटल्यावरुन वाद झाला होता. यावेळी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान बाचाबाची झाली होती. सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांच्या झटापटीत पोलिस शिपाईक विकास थोरबोले जखमी झाले होते.

या प्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह एकूण 17 जणांविरोधात मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमवाबंदीची गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी आता कामिनी शेवाळेंना एका वर्षाची तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, कामिनी शेवाळेंसह 17 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने तूर्तास जामीन मंजूर केला आहे.

कोण आहेत राहुल शेवाळे?

राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. 2007, 2012 मध्ये ते नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत निवडून आले होते. त्यानंतर 2012-14 मध्ये त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यानंतर 2014 साली राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेवर निवडून आले. सध्या ते केंद्रीय नगर विकास समितीचे सदस्य आहेत. शिवाय, राहुल शेवाळे यंदाही दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याशी राहुल शेवाळे यांच्याशी शेवाळेंची लढत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *