स्मारकं कशाला? शोभा डेंचा सवाल, तर बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधात याचिका

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रस्तावित स्मारक अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या स्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी स्मारकासाठी सरकारने मंजुर केलेल्या 100 कोटी रुपयांवर आक्षेप घेतला आहे. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आक्षेप घेतला आहे. शोभा डे यांनी या स्मारकासाठी राज्य सरकारने …

स्मारकं कशाला? शोभा डेंचा सवाल, तर बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधात याचिका

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रस्तावित स्मारक अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या स्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी स्मारकासाठी सरकारने मंजुर केलेल्या 100 कोटी रुपयांवर आक्षेप घेतला आहे. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आक्षेप घेतला आहे. शोभा डे यांनी या स्मारकासाठी राज्य सरकारने 100 कोटी देण्याला विरोध केला आहे. स्मारकं कुणाला हवी आहेत, असा सवाल शोभा डे यांनी उपस्थित केला. शोभा डे यांनी 100 कोटी मला द्या मी जनतेसाठी कोणकोणत्या सुविधा देऊ शकते ते पाहा, असं ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये शोभा डे म्हणतात, “मला शंभर कोटी द्या, मी एक नागरिक म्हणून ही रक्कम नागरिकांसाठी किती फायद्याची ठरू शकते हे दाखवून देईन. स्मारकं कुणाला हवी आहेत? आम्हाला रुग्णालयं आणि शाळा हव्या आहेत”

स्मारकासाठी 100 कोटी
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकार 100 कोटी रुपये देणार आहे. तशी तरतूद करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली. हे स्मारक उभारण्याची निर्मिती ‘एमएमआरडीए’कडे सोपवण्यात आली आहे.

स्मारकाचं गणेशपूजन
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला त्यांच्या स्मारकाचा श्रीगणेशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. मुंबईच्या शिवाजी पार्कातील परिसरातील महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचं गणेशपूजन झालं. महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक असा ओळखला जाणार आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधात याचिका
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जनहित मंचाच्यावतीने भगवानदास रयानी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सरकारी वास्तू स्मारकासाठी देणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिसूचनेचा भंग असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. राजकीय नेत्याच्या स्मारकासाठी अशा पद्धतीने बंगला देता येत नसल्याचे याचिकेत म्हटलं आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांना ही बाब कळवण्यात आली होती. तरीही त्यांनी मंजुरी दिल्याबद्दल याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या

बाळासाहेबांच्या स्मारकाचं गणेशपजून, उद्धव-फडणवीसांचा एकमेकांना वाकून नमस्कार

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर

बाळासाहेबांच्या स्मारकाचं गणेशपूजन 23 जानेवारीला महापौर बंगल्यात 

अमिताभ ते संजय दत्त, बाळासाहेबांच्या मित्र यादीत कोण-कोण?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *