एनसीबीच्या कार्यालयासमोर पत्रकार भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी सुरू असलेल्या एनसीबीच्या कार्यालयासमोर पत्रकारांमध्येच जुंपली. (Channel Journalist fight in front of NCB Office)

एनसीबीच्या कार्यालयासमोर पत्रकार भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी सुरू असलेल्या एनसीबीच्या कार्यालयासमोर आज सकाळी पत्रकारांमध्येच जुंपली. पत्रकारांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे वेळीच हा वाद निवळला. (Channel Journalist fight in front of NCB Office)

ड्रग्स प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिमॉन खंबाटाची गेल्या एक तासापासून चौकशी सुरू आहे. अभिनेत्री रकूल प्रीत सिंग आणि श्रृती मोदी यांचीही आज चौकशी होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच सर्व पत्रकार एनसीबी कार्यालयासमोर जमले होते. यावेळी पत्रकारांना बातमी कव्हर करण्यासाठी देण्यात आलेल्या जागेवर उभं राहण्यावरून दोन पत्रकारांमध्ये वाद झाला. शिवाय एका चॅनेलचा पत्रकार तर आरडाओरडा करत बातमी कव्हर करत होता. त्याने इतरांना कव्हरेज करताना व्यत्यय येत होता. त्यामुळे या पत्रकारांनी आरडाओरड करून कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने इतर पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे पत्रकार म्हणून हिणवले. त्यामुळे संतापलेल्या पत्रकारांनी या पत्रकाराला चोप देण्यास सुरुवात केल्याने एनसीबीच्या कार्यालयाबाहेर एकच हंगामा झाला.

पत्रकारांची ही बाचाबाची अनेक वृत्तवाहिन्यांवर लाइव्हही चालवली गेली. त्यात पत्रकार एकमेकांना भिडताना दिसत होते. पत्रकारांचा गोंधळ ऐकून पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पत्रकारांच्या दोन्ही गटातील वाद थांबला आहे.

दरम्यान, एनसीबीने ड्रग्स प्रकरणी समन्स बजावल्यानंतर फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे. गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून तिची एनसीबी कार्यालयात पोहोचली असून एनसीबीकडून आतापर्यंतच्या तपासात गोळा केलेले पुरावे, इतरांचे जबाब या सगळ्या गोष्टी सिमॉनसमोर ठेवण्यात येणार आहेत.

या पुराव्यांच्या आधारावरच तिला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे सिमॉन खंबाटा एनसीबीच्या प्रश्नांना कशी उत्तर देणार आणि या चौकशी दरम्यान आणखी कोणाचे नाव समोर येणार, की नवीन माहिती उघडकीस होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना बोलावणे धाडले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसात चौघींची चौकशी होणार आहे.(Channel Journalist fight in front of NCB Office)

संबंधित बातम्या : 

Rakul Preet | समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ, एनसीबीचा दावा

Deepika Padukone | एनसीबी समन्सनंतर दीपिका चार्टर्ड विमानाने मुंबईला, रणवीरही टेंशनमध्ये

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *