Deepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ कळवली

मुंबईत आल्यानंतर दीपिका सर्वात आधी वरळीतील ब्योमाँड टॉवरमध्ये असलेल्या आपल्या घरी जाईल. त्यानंतर पुढे काय करायचं, हे ती ठरवणार आहे.

Deepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ कळवली

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण दुपारी मुंबईत दाखल झाली आहे. यानंतर तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं कळवलं आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगही वकिलांची जुळवाजुळव करत आहे. (Actress Deepika Padukone returns Mumbai after NCB summons)

दीपिका पदुकोण आज (24 सप्टेंबर) दुपारी दीड वाजता मुंबईत दाखल झाली. ती खासगी चार्टर्ड विमानाने गोव्याहून मुंबईला आली. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर दीपिका सर्वात आधी वरळीतील ब्योमाँड टॉवरमध्ये असलेल्या आपल्या घरी गेली. सध्या ती या प्रकरणातील पुढील रणनीती ठरवत आहे.

दीपिका दिग्दर्शक करण जोहरच्या एका चित्रपटाचं गोव्यात चित्रीकरण करत होती. मात्र, एनसीबीने समन्स बजावल्यानंतर दीपिकाने तातडीने चित्रीकरण थांबवलं. त्यानंतर 12 वकिलांची फौज दीपिकाच्या दिमतीला लागली.

दीपिकाला एनसीबीने समन्स बजावल्याने तिचा पती अभिनेता रणवीर सिंगही काळजीत आहे. रणवीर सिंग व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून दीपिकाच्या संपर्कात राहत होता. आता दीपिका मुंबईत आल्यावर दाम्पत्य पुढील प्लॅन ठरवेल.

बड्या बॉलिवूड अभिनेत्री रडारवर

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना बोलावणे धाडले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे.

सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांना आज (24 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे. सिमॉनने एनसीबी कार्यालय गाठलं, मात्र रकुलने समन्स मिळाले नसल्याचा दावा केला आहे. दीपिका उद्या (शुक्रवार 25 सप्टेंबर), तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना परवा (शनिवार 26 सप्टेंबर) हजर राहण्याचे आदेश आहेत. साराही सुट्टी घालवण्यासाठी आपल्या आई अभिनेत्री अमृता सिंह यांच्यासह गोव्यातील घरी राहत आहे. (Actress Deepika Padukone returns Mumbai after NCB summons)

संबंधित बातम्या 

सिमॉन खंबाटा चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात, रकुलचे बहाणे

एनसीबीच्या समन्सनंतर दीपिका सतर्क, चित्रीकरण थांबवलं

(Actress Deepika Padukone returns Mumbai after NCB summons)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *