जेट एअरवेजच्या 2000 कर्मचाऱ्यांना स्पाईसजेट नोकरी देणार

मुंबई : जेट एअरवेजच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना स्पाईसजेट एअरलाईन्स कंपनी नोकरी देणार, अशी घोषणा कंपनीचे चेअरमन अजय सिंह यांनी केली. सध्या जेटएअरवेज कंपनी आर्थिक परिस्थितीमुळे बंद पडली आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आलं आहे. या कर्माचाऱ्यांना आधार देण्यासाठी स्पाईसजेट कंपनीने हा निर्णय घेतला आहे. स्पाईसजेटने जेट एअरवेजच्या 22 विमानांनाही आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं […]

जेट एअरवेजच्या 2000 कर्मचाऱ्यांना स्पाईसजेट नोकरी देणार
Follow us
| Updated on: Jun 03, 2019 | 12:20 PM

मुंबई : जेट एअरवेजच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना स्पाईसजेट एअरलाईन्स कंपनी नोकरी देणार, अशी घोषणा कंपनीचे चेअरमन अजय सिंह यांनी केली. सध्या जेटएअरवेज कंपनी आर्थिक परिस्थितीमुळे बंद पडली आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आलं आहे. या कर्माचाऱ्यांना आधार देण्यासाठी स्पाईसजेट कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

स्पाईसजेटने जेट एअरवेजच्या 22 विमानांनाही आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज कंपनी आता पूर्णपणे बंद पडली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगारही दिलेले नाहीत.

“आम्ही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना आमच्या कंपनीत घेणार आहोत. त्यांच्यात क्षमता आहे आणि ते मेहनतीही आहेत. यापुढेही आम्ही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याच्या प्रयत्नात असू”, असे अजय सिंह म्हणाले.

“आम्ही जेट एअरवेजच्या 1100 कर्मचाऱ्यांना आमच्या कंपनीत घेतलं आहे. अपेक्षा आहे की हा आकडा 2 हजार पर्यंत जाईल. यामध्ये पायलट, चालकांचा समावेश असेल. तसेच विमानतळावरील सुरक्षा रक्षकांचाही यामध्ये समावेश असेल”, असेही अजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

सध्या स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांची संख्या 14 हजार आहे आणि त्यांच्या ताफ्यात 100 विमानं आहेत. 100 विमान असलेल्या कंपनीच्या यादीत एअर इंडिया, जेट एअरवेज (आता बंद पडलेली कंपनी) आणि इंडिगोनंतर चौथी कंपनी स्पाईसजेट आहे.

स्पाईसजेटजवळ बोइंग 737, बॉम्बार्डिअर क्यू 400 आणि बी 737 फ्रायटर विमानं आहेत. स्पाईसजेट दिवसाला 575 विमानांचं उड्डाण करते. यामध्ये 9 आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांचाही समावेश आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.