एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; लग्नाच्या वराती ऐवजी निघाली 20 जणांची प्रेतयात्रा

Uttarakhand Accident - लग्नाच्या शुभ कार्याचा आनंद एका क्षणात दु:खात परावर्तीत झाला आहे.

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; लग्नाच्या वराती ऐवजी निघाली 20 जणांची प्रेतयात्रा
| Updated on: Oct 05, 2022 | 3:06 AM

पौडी : लग्नाच्या शुभ कार्याचा आनंद एका क्षणात दु:खात परावर्तीत झाला आहे. लग्नाच्या वराती ऐवजी निघाली 20 जणांची प्रेतयात्रा निघणार आहेत. उत्तराखंडमधील( Uttarakhand) पौडी येथे एक भयानक अपघात झाला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस दरीत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमधील पौडी येथे मंगळावरी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस सिमडी गावाजवळ 500 मीटर खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 50 जण होते.

ही बस दुपारी बाराच्या सुमारास बस लालडंग येथून कांडा मल्लाच्या दिशेने निघाली होती. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की 20 जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत लोकांचा शोध सुरु आहे.

अपघाताचे वृत्त समजताच श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थही बचावकार्यात मदत करत आहेत.

बिरोखल आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील या दुर्घटनेचा आढावा घेतला. तसेच तात्काळ मदत पोहचवण्याच्या सूचना केल्या आहेत.