Big Breaking : गुजरातमध्ये भयानक दुर्घटना; 500 जण नदीत पडले

| Updated on: Oct 30, 2022 | 8:05 PM

या दुर्घटनेत जवळपास 500 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Big Breaking : गुजरातमध्ये भयानक दुर्घटना; 500 जण नदीत पडले
Follow us on

अहमदाबाद : गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 500 जण नदीत पडले आहे. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास 500 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या पुलावर 500 जण असल्याची माहिती समोर आली होती. देशभरात सध्या छटपुजेचा उत्साह आहे. छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते.  या उत्साहादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरझन पडलं आहे.

पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर 500 जण होते. पण पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. नदीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आली आहे.