
भारतामध्ये अशी अनेक गावं आहेत, ज्या गावांना विशिष्ट कामांमुळे, प्रथेमुळे, परंपरेमुळे ओळख मिळाली आहे, ही गावं देशातच नाहीत जर जगप्रसिद्ध आहेत. यातील अनेक गावं अशी देखील आहेत, ज्या गावांमध्ये एखादी विशिष्ट प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू असते, आणि त्यामुळेच या गावाला प्रसिद्धी मिळते. अशा काही प्रथा आज देखील पाळल्या जातात, त्यामुळे त्या गावाबद्दल तेथील लोकांबद्दल आपोआप कुतूहल निर्माण होतं.
तर दुसरीकडे भारतात अशी देखील काही गावं आहेत, काळाच्या ओघात त्या प्रथा आता नष्ट झाल्या आहेत, मात्र त्या प्रथेच्या दंताकथा बनल्या आहेत. अशा कथांमुळे देखील ही गावं कायमच चर्चेत राहाता, अशा कथांमुळे या गावांभोवती एक रहस्यमयतेचं वलय निर्माण होतं, आज आपण अशाच एका गावाबद्दल माहिती घेणार आहेत.
भारतामध्ये असं एक गाव आहे, ज्या गावात पुरुष आजही जाण्यासाठी घाबरतात. आपण जर या गावात गेलो तर आपण एखादा प्राणी बनू असा गैरसमज आणि भीती आजही पुरुषांमध्ये पाहायला मिळते. या गावाचं कनेक्श महाभारतासोबत जोडलं जातं. या गावात पुरुष जात नाहीत याचं कारण म्हणजे काळी जादू
हे गाव आसाम राज्यातील गुवाहाटीपासून अवघ्या 50 किलोमीटरवर आहे. मायोंग असं या गावाचं नाव असून, या गावात फक्त महिलांचं राज्य आहे, पुरुष तर या गावातही जायला घाबरतात, काळ्या जादूमुळे आपण प्राणी बनू असा समज पुरुषांमध्ये आहे.
पुरुषांच्या भीतीला कारण म्हणजे या गावची एक कथा आहे. हे गाव काळ्या जादूसाठी प्रसिद्ध आहे. या गावाला ब्लॅक मॅजिक कॅपिटल म्हणून देखील ओळखलं जातं. या गावात कधिकाळी फक्त महिलांचं राज्य होतं, गावात पुरुषांना येण्यास बंदी होती, येथील महिला काळ्या जादूमध्ये फारच पारांगत होत्या, इथे जो पुरुष येईल त्याला त्या त्यांच्या काळ्या जादूने प्राणी बनवायच्या, अशी ही कथा आहे, त्यामुळे आजही या गावात पुरुष जाण्यासाठी घाबरतात, मात्र महिला बिनधास्त न भीता जातात. या गावात एखाद्या व्यक्तीला लागलेलं भूत देखील उतरवलं जातं, असाही दावा केला जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)