असं एक गाव जिथे रेंटवर मिळते गर्लफ्रेंड, पसंती जुळली तर थेट लग्नच, लग्नाळू तरुण करतात गर्दी
भारतासह जगभरात अशी अनेक गावं आहेत, जी वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. काही गाव हे अति श्रीमंतीमुळे प्रसिद्ध आहेत, तर काही गावं हे तेथील नैसर्गिक संरचनेसाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये एक गाव असं देखील आहे, जिथे तुम्हाला चक्क रेंटने गर्लफ्रेंड मिळते.

भारतासह जगभरात अशी अनेक गावं आहेत, जी कोणत्या न कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही गाव हे अति श्रीमंत आहेत, ही गाव एवढी श्रीमंत आहेत, की त्यांच्या श्रीमंतीची चर्चा संपूर्ण जगभरात होते. त्यामुळे ही गावं एक पर्यटन केंद्र बनतात. या गावांना भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतात, त्या गावांच्या विकास मॉडेलचा अभ्यास देखील करतात. तर काही गावं हे तेथील विशिष्ट नैसर्गिक संरचनेसाठी प्रसिद्ध असतात. येथील निसर्गाचे विवविध चमत्कार पाहण्यासाठी दूरवरून लोक या ठिकाणी गर्दी करतात. यामुळे या गावांच्या आर्थिक विकासला बळ मिळतं. दरम्यान अशी देखील काही गावं या जगाच्या पाठीवर आहेत, जिथे तुम्हाला चक्क गर्लफ्रेंड रेंटने मिळते.
भारतामध्ये असलेल्या एका गावाची देखील अनेकदा या संदर्भाने चर्चा होते. हे गाव मध्य प्रदेशमध्ये आहे. शिवपुरी असं या गवाचं नाव आहे. शिवपुरीमध्ये धडीच्या नावाच्या प्रथेचं शेकडो वर्षांपासून पालन होत आलं आहे. इथे वर्षातून एकदा चक्क लग्नासाठी तरुणींचा बाजार भरतो. ज्या तरुणांना लग्न करायचं आहे, असे तरुण या ठिकाणी येतात, जी मुलगी पसंत पडते तिचं लग्न त्या तरुणासोबत लावलं जातं. मात्र ही सर्व लग्न करार तत्वावर असतात, संबंधित तरुणीच्या कुटुंबासोबत विशिष्ट कालावधीसाठी करार करण्यात येतो. त्यामोबदल्यात तरुण या तरुणीच्या कुटुंबाला पैसे देखील देतात, असं बोललं जातं. हे करार एक हजार रुपयांपासून तर लाखो रुपयांच्या घरात असतात.
दरम्यान भारतामध्ये जसं हे गाव आहे, तशीच काही गावं ही थायलंडमध्ये देखील आहेत. मात्र इथे ही प्रथा थोडी वेगळी आहे. थायलंडमध्ये अशी अनेक कोरर आर्यलंड आहेत, जिथे तुम्हाला चक्क गर्फफ्रेंड भाड्याने मिळते. त्याबदल्यात तुम्हाला तिला पैसे द्यावे लागतात. समजा तुम्हाला जर ती तरुणी आवडली तर तुम्ही तिच्यासोबत कायमचं लग्न देखील करू शकतात. सध्या या पद्धतीने अनेक लग्न झाल्याची उदाहारणं देखील आहेत. त्यामुळेच आता या ठिकाणी लग्नाळू तरुण गर्दी करत आहेत.