LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या नियमात महत्त्वाचा बदल, काय आहे नवा नियम?
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या नियमात महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. जाणून घ्या नवीन नियम.

देशभरातली एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. घरगुती सिलिंडर वापरत असाल, त्यात तुम्हाला सरकारने देऊ केलेली सब्सिडी ठेवायची असेल, तर आधार प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करावी लागणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून सब्सिडी दरात गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना आधारची पडताळणी करणे अनिवार्य असणार आहे. सब्सिडीचा लाभ हा योग्य व्यक्ती घेत आहे का, याची पडताळणी सरकार करत आहे.
एलपीजी ग्राहकांनी आधारद्वारे पडताळणी केली नसलेल्यांना सरकारने वेळ वाढवून दिला होता. सरकारने 30 जून पर्यंत वेळ दिला होती. परंतु केंद्र सरकारने पुढे मुदतवाढ दिली. परंतु आता एलपीजी सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य असणार आहे. तसेच ज्या ग्राहकांनी आधीच ई-केवायसी केली असेल, त्यांना पुन्हा नव्याने प्रक्रिया करण्याची गरज नाही.
आधार प्रमाणीकरण करण्याचे मार्ग काय?
डिलिव्हरी बॉय हा घरी गॅस सिलिंडर घेऊन येईल, त्यावेळी पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करता येईल. तसेच गॅस एजन्सीला भेट देऊन करता येईल. गॅस एजन्सीमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करता येईल. त्याचबरोबर मोबाईल अॅप्सद्वारे करता येईल. अधिकृत मोबाईल अॅप्सचा वापर करून डिजिटल पद्धतीने आधार प्रमाणीकरण करता येईल. इंडियन ऑइल वन, हॅलो बीपीसीएल, एचपी पे असे तीन अॅपचा वापर करून आधार प्रमाणीकरण करता येईल.
Ministry of Petroleum & Natural Gas: Biometric Aadhaar Authentication Mandatory for Subsidised Domestic LPG Refills from 1 October 2026. 27.43 crore consumers (89.9 per cent) have already completed authentication and need not do anything further. Authentication can be completed… pic.twitter.com/QOP5FYmrh0
— ANI (@ANI) September 19, 2026
आता 1 ऑक्टोबरपासून नियम केला कडक
तत्पूर्वी, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने दिला जातो. सप्टेंबर 2026 मध्ये 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडवरील अंदाजित अनुदान हे 210 रुपये इतके आहे. जून महिन्यात वाढून 721 रुपये झाले होते. एलपीजी सिलिंडरचा आधार प्रमाणीकरणासाठी अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु आता 1 ऑक्टोबरपासून हाच नियम अधिक कडक केला जाणार आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ग्राहक हे 1800 2333 555 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या क्रमाकांवर कॉल करून ग्राहक समस्या सोडवू शकतो. तसेच व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी घरगुती सिलिंडरचा होणारा गैरवापर रोखणे, बोगस कनेक्शन रद्द करणे आणि खऱ्या गरजू ग्राहकांपर्यंतच अनुदानाचा लाभ पोहोचवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.