CJP Protest : मोठी बातमी! सीजेपीकडून नव्या आंदोलनाची घोषणा, आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात…नेमका प्लॅन काय?

कॉकरोच जनता पार्टीने येत्या 7 नोव्हेंबर रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके स्वतः करणार आहेत. त्यांच्यासोबत CJP चे दक्षिण विभाग प्रमुख विजय मल्लांगी आणि राष्ट्रीय सचिव आफ्रीन नवाज हेदेखील या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत.

CJP Protest : मोठी बातमी! सीजेपीकडून नव्या आंदोलनाची घोषणा, आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात...नेमका प्लॅन काय?
cjp and abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 9:27 PM

CJP New Protest : गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. काहीही झालं तरी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी विरोधक तसेच कॉकरोच जनता पार्टीकडून केली जातेय. याच मागणीसाठी 1 नोव्हेंबर रोजी विरोधकांनी दिल्लीत महामोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी नेमकं काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आता सीजेपीने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

सीजेपीची नेमकी घोषणा काय?

कॉकरोच जनता पार्टीने येत्या 7 नोव्हेंबर रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके स्वतः करणार आहेत. त्यांच्यासोबत CJP चे दक्षिण विभाग प्रमुख विजय मल्लांगी आणि राष्ट्रीय सचिव आफ्रीन नवाज हेदेखील या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनाची घोषणा सीजेपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे

Loading...

सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय आहे?

“लोकशाही वाचवा! SIR रद्द करा! 7 नोव्हेंबर, दुपारी 4 वाजता राजेंद्र मैदान, कोची येथे एकत्र या,” असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीनं आपल्या एक्स पोस्टद्वारे केलं आहे. “कोचीमध्ये जंतर मंतर” या शीर्षकाखाली हे आंदोलन 7 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता केरळमधील कोची येथील ‘राजेंद्र मैदान’ येथे पार पडणार असून पक्षाच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

आंदोलना यशस्वी होणार का?

दरम्यान, एक नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विरोधकांच्या आंदोलनालाही सीजेपीने पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा देताना ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील हे आंदोलन आणखी मोठे केले जाईल, असे संकेत सीजेपीने दिले होते. या आंदोलनात हजारो लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता. आता कोची येथील आंदोलात स्वत: अभिजीत दीपके उतरणार असल्याने या लढ्याला वेगळे महत्त्व आले आहे. त्यामुळे सीजेपीच्या या आंदोलनात किती लोक सहभागी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us