AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे घडायला नको होतं तेच… दीपकेंच्या त्या कागदपत्रांवर सह्या, काय लिहिलंय त्यात? दिल्ली पोलिसांचा डाव काय?

अभिजीत दीपके यांच्या 'लहरा दो तिरंगा मार्च'ला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी दीपके यांना नोटीस देऊन कारवाईचा इशारा दिला आहे, ज्यावर दीपके यांची सही घेण्यात आली. परवानगीशिवाय मार्च काढल्यास कायदेशीर कारवाई होईल, असे नोटिशीत म्हटले आहे. दिल्ली पोलिसांचा हा 'गेम' नेमका काय आहे आणि नोटिशीत काय लिहिले आहे, यावर चर्चा सुरू आहे.

जे घडायला नको होतं तेच... दीपकेंच्या त्या कागदपत्रांवर सह्या, काय लिहिलंय त्यात? दिल्ली पोलिसांचा डाव काय?
Abhijeet DipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 4:24 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी लहरा दो तिरंगा मार्चचं दिल्लीत आयोजन केलं आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला मनाई केली असून दीपके यांना नोटीस दिली आहे. दिल्ली पोलिसांनी दीपके यांच्या घरी येऊन ही नोटीस दिली आहे. त्यावर दीपके यांची सही घेतली आहे. तुम्ही परवानगीशिवाय तिरंगा रॅली काढली तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराच दिल्ली पोलिसांनी या नोटिशीतून त्यांना दिला आहे. मात्र, दीपके यांनी ज्या कागदपत्रांवर सही केली त्यात नेमकं काय लिहिलंय? दिल्ली पोलिसांनी दीपकेंचा गेम तर केला नाही ना? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.

दिल्ली पोलिसांच्या एका टीमने आज दुपारी अभिजीत दीपके यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्याांना एक नोटीसही दिली. त्यावर त्यांची सहीही घेतली. एनसीपीचे प्रक्ते अनिस गवंडे यांच्या पंचकुइँया रोड येथील घरी दीपके थांबले आहेत. या नोटिशीत महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. कॅनॉट प्लेसमध्ये कलम 163 लावण्यात आले आहे. तुम्ही तिरंगा रॅलीसाठी दिल्ली महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. तरीही तुम्ही सेंट्रल पार्कला आला तर बीएनएसएसच्या कलम 163चं ते उल्लंघन ठरणार आहे. असं केल्यास तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं या नोटिशीत म्हटलं आहे. त्यावर दीपके यांनी सही केली आहे.

तिथे जमू नका, योग्य होणार नाही

तिरंगा फडकावणं कायद्याच्या विरोधात नाहीये. पण परवानगीशिवाय मार्च काढणं आणि गर्दी जमवणं कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करणार, असं या नोटिशीत म्हटलं आहे. कॅनॉट प्लेस एक व्यस्त आणि व्यावसायिक भाग आहे. तिथे आत आणि बाहेर जाण्याचे रस्ते थोडेच आहेत. त्यामुळे तिथे जमल्यावर तो संपूर्ण परिसर बाधित होऊ शकतो. त्यामुळे लोकांना बाहेर पडणं मुश्किल होऊ शकतं. खासकरून आपत्कालिन परिस्थितीत अडचण येऊ शकते. तिथे शोरूम, रेस्टॉरंट, हॉटेल आणि बँका आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने त्या ठिकाणी संध्याकाळी मोठी गर्दी होत असते. सुमारे 15 लाख कर्मचारी आणि व्यापारी त्यावर अवलंबून आहेत, असं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.

कारवाईचा इशारा

कॅनॉट प्लेसच्या बाजूला राजीव चौक सारखे महत्त्वाचे मेट्रो स्टेशन, संसद भवन, केंद्रीय सचिवालय आदी गोष्टी आहेत. त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या परिसरात गर्दी झाल्यास वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होईल. शिवाय सामान्य नागरिकांच्या अधिकारांना बाधा उत्पन्न होईल, असं या नोटिशीत म्हटलं आहे. तसेच या ठिकाणी बीएनएसएसचे कलम 163 लागू आहे. त्याचं उल्लंघन केल्यास बीएनएसएसच्या कलम 223 आणि इतर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. सीजेपीच्या आधीच्या आंदोलनामुळे शांतता भंग झाली होती. ज्या नियमांतर्गत परवानगी दिली होती, त्याचं उल्लंघन झालं होतं, असं या नोटिशीत म्हटलं असून संसद मार्चचाही त्यात उल्लेख आहे.

दीपके काय म्हणाले?

नोटिशीवर सही केल्यानंतर दीपके यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मी तिरंगा मार्चची हाक दिली होती. सात आठ दिल्ली पोलीस आले होते. त्यांनी मला नोटीस देऊन तुम्ही बेकायदेशीर कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही लोकांना भडकवत आहात. तुम्ही तिरंगा फडकवण्यासाठी जाऊ शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं. आपल्या देशात तिरंगा फडकावण्यास मनाई केली जात आहे. मोदीजी, आम्ही आपल्या देशात तिरंगा फडकवू शकत नाही, असं काम तुम्ही केलंय, अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली आहे.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त