अभिजीत दिपके यांचा अत्यंत मोठा निर्णय, ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या भेटीनंतर मोठे विधान..

नीट पेपरफुटीविरोधात सीजेपीला मोठे यश मिळाले. कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभारले. त्यातच आज दिल्ली इंडिया आघाडीकडून मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यानच अभिजीत दिपके यांनी आपली मोठी भूमिका जाहीर केली.

अभिजीत दिपके यांचा अत्यंत मोठा निर्णय, ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या भेटीनंतर मोठे विधान..
Abhijeet Dipke
| Updated on: Nov 01, 2026 | 9:19 AM

1 नोव्हेंबर 2026 ला दिल्लीत रामलीला मैदानात विरोधी पक्ष इंडिया आघाडी यांच्याकडून मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या एक दिवस अगोदर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीत अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली. सीजेपीचे नेते दिल्लीत आहेत. सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट अभिजीत दिपके यांनी घेतली. कथित मतदान चोरी, निवडणुक आयोग यांच्याविरोधात सीजेपीने समर्थन दिले. पण आज होणाऱ्या रॅली सीजेपी सहभागी होणार नाही. कॉकरोच जनता पार्टी विरोधी पक्षाच्या या रॅलीत सहभागी होणार नाही. त्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांना त्यांची ओळख स्वतंत्र ठेवायची आहे. ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, मी टीएमसीच्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी पोहोचलो होतो.

नीट पेपरफुटीविरोधात आमचे जंतरमंतरवर जे आंदोलन सुरू होते, त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी आमचे समर्थन केले. दिल्ली पोलिसांनी साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली होती, त्यावेळी ममता बॅनर्जी या आमच्यामागे भक्कमपणे उभ्या होत्या. आजच्या रॅलीत सहभागी होण्याबद्दल बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आम्ही या रॅलीचे पूर्णपणे समर्थन करतो. पण कॉकरोच जनता पार्टी त्या रॅलीत सहभागी होणार नाही.

Loading...

आमचा पक्ष स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाच्या रॅलीत सहभाही होणार नाहीत. कोणीही मतचोरी विरोधात आंदोलन करत असेल तर त्याला सीजेपीचा पाठिंबा असेल. ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, आमच्या रॅलीला सीजेपीने पूर्णपणे समर्थन दिले. कोलकातामध्ये मी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, त्याकरिता मी सीजेपीच्या नेत्यांना बोलवणार आहे.

1 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानात विरोधी पक्षाकडून मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची तयारी जोरदार केली जात आहे. इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते दिल्लीत आहेत. यादरम्यानच सीजेपीने स्पष्ट केले की, आजच्या रॅलीत ते सहभागी होणार नाहीत, पण त्यांचे या रॅलीला पूर्णपणे समर्थन आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us