दिल्ली पोलिसांकडून महिला पत्रकाराचा छळ; अभिजीत दिपके संतापले, व्हिडीओतून संताप व्यक्त करत म्हणाले…

Abhijit Dipke on Women Journalist Harassment: जंतर मंतरवरील आंदोलनाच्या वार्तांकनात महिला पत्रकारांचा छळाचा आरोप करण्यात आला आहे अभिजीत दिपकेंनी यावर संताप व्यक्त केला आहे.

दिल्ली पोलिसांकडून महिला पत्रकाराचा छळ; अभिजीत दिपके संतापले, व्हिडीओतून संताप व्यक्त करत म्हणाले...
| Updated on: Oct 04, 2026 | 12:15 AM

जंतर मंतरजवळ सुरू असलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करत असताना दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्याने आपला छळ केल्याचा आरोप दोन महिला पत्रकारांनी केला आहे. या घटनेनंतर छळ आणि हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शेकडो पत्रकार पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर जमले आहे. तसेच यावर आता कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपकेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओतून प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका स्वतंत्र वृत्तसंस्थेशी संबंधित दोन महिला पत्रकारांना छळाचा सामना करावा लागला. मी तीन तासांहून अधिक काळ पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये बसून आहे. शनिवारी जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान जेव्हा आयसा कार्यकर्ती नेहा बोरा हिला बसमध्ये ताब्यात घेतले जात होते, तेव्हा मी त्या घटनेचे वार्तांकन करत होते. दिल्ली पोलीस अधिकारी विवेक भगतने माझा विनयभंग केला आणि नंतर मला ढकलले, असा आरोप महिला पत्रकाराने सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ संदेशात केला आहे.

Loading...

या घटनेवर प्रतिक्रिया देताना कॉकरोच जनता पार्टीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले की, दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून छळ आणि मारहाणीचा आरोप करत शेकडो पत्रकार पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करत आहेत.दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांकडून छळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करत शेकडो पत्रकार पार्लमेंटरी स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करत आहेत. सचिन शर्मासारख्यांनी भरलेली दिल्ली पोलीस, झपाट्याने राष्ट्रीय शरमेची पोलीस बनत आहे.

यानंतर यावर अभिजीत दिपकेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी एका व्हिडिओतून संताप व्यक्त केला आहे. अभिजीत दिपके म्हणाले की, महिलांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आणि तडजोड न करण्यासारखी बाब आहे. आमची भूमिका मांडण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. मी प्रवासात होतो आणि नुकताच घरी पोहोचलो आहे, त्यामुळेच मला ती आधी मांडता आली नाही; तरीही, सकाळीच माझ्या टीमला त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत गुन्हा दाखल केला पाहिजे.

ते म्हणाले की, विवेक भगत यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले आहे. विवेक भगत यांना सचिन शर्मा वाचवत आहेत का? जंतरमंतरवर लाठीचार्ज करणारे सचिन शर्मा होते. ती महिला जेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती, तेव्हा तिची तक्रार ऐकून घेतली नाही. पत्रकार जेव्हा आंदोलन करत आहेत. तर त्यांना ताब्यात घेतले जात आहे. हे कुणाच्या इशाऱ्यावर होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us