AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार, घटनेनंतर आरोपी फरार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 26 सप्टेंबर रोजी घडली आहे. एम्समध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने तिच्या सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. आरोपी एम्समध्ये डॉक्टर म्हणूनही कार्यरत आहे.

एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार, घटनेनंतर आरोपी फरार
एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 5:03 PM
Share

नवी दिल्ली : वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावून वरिष्ठ डॉक्टरने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करीत दिल्ली एम्स रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने केला आहे. याप्रकरणी महिल डॉक्टरने हौज खास पोलीस ठाण्यात वरिष्ठ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Abuse of a female colleague by a senior AIIMS doctor in delhi)

26 सप्टेंबर रोजी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 26 सप्टेंबर रोजी घडली आहे. एम्समध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने तिच्या सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. आरोपी एम्समध्ये डॉक्टर म्हणूनही कार्यरत आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की 26 सप्टेंबर रोजी आरोपीने तिला वाढदिवसाच्या पार्टीसाठी आपल्या घरी बोलावले होते. वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्याशिवाय इतर अनेक लोक होते.

दरम्यान, संधी साधून आरोपीने महिला डॉक्टरला खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम 376 आणि 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचा बलात्कार

गेली काही वर्ष आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर 28 जणांच्या साथीने बलात्कार करणाऱ्या पित्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील एका 17 वर्षीय मुलीने समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्यांसह तिच्या वडिलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या दोन दिवसानंतर तिच्या आईने आता आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बलात्कार पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, पतीने तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला तिच्या सासरच्या लोकांसह घरगुती हिंसाचाराचा बळी बनवले. महिलेने पती आणि सासरच्या लोकांसह 11 लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 2003 मध्ये आरोपीने तिच्या आई-वडिलांना अंमली पदार्थ देऊन घरातून तिचे अपहरण केले होते. त्याने तिचे सोन्याचे दागिनेही घेतले होते. नंतर महिलेला जबलपूर येथे नेण्यात आले, जिथे त्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आर्य समाज मंदिरात तिचे जबरदस्तीने लग्न केले गेले.

आईचा खून करुन मृतदेह झुडपात टाकला

आईचा खून करुन फरार झालेला मुलगा अखेर गजाआड झाला आहे. श्रीराम नागनाथ फावडे याला बार्शी पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे चार दिवसांपूर्वी श्रीरामने जन्मदात्या आईचा खून केला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत उघडकीस आली आहे.

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 वर्ष, रा. वाणी प्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21 वर्ष) असं आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. रात्री झोपेत असताना आईच्या डोक्यात दगड घालून श्रीराम फावडेने आईचा खून केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह गादीसकट बाहेर ओढत आणून झुडपात टाकून तो पसार झाला होता. (Abuse of a female colleague by a senior AIIMS doctor in delhi)

इतर बातम्या

धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या

खतरनाक ! आई झुम मिटींगवर, पोराच्या हाती बापाची पिस्टल लागली मग काय डॅण्टॅडॅणsssss

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.