फारकत घेतलेल्या बायकोच्या हत्येचा कट, कर्ज काढून 13 लाखांची सुपारी, पोलीसांचीही अफलातून खेळी, आरोपी जेरबंद

पोलीस नीनाला सिनेमा मेकअप आर्टिस्टकडे घेऊन गेले. तिचा अशा प्रकारे मेकअप केला, की तिचा फोटो पाहून कोणीतरी तिचा गळा कापला आहे, असेच वाटेल. पोलिसांनी आधीच सुपारी किलरला अटक केली होती, पण नीनाच्या घटस्फोटित पतीला ते माहित नव्हते.

फारकत घेतलेल्या बायकोच्या हत्येचा कट, कर्ज काढून 13 लाखांची सुपारी, पोलीसांचीही अफलातून खेळी, आरोपी जेरबंद

मॉस्को : विभक्त पत्नीच्या हत्येचा कट रचणाऱ्या तरुणाला रशियातील पोलिसांनी अत्यंत फिल्मी शैलीत अटक केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी मेकअप आर्टिस्टची मदत घेतली, खुनाचे दृश्य चित्रीत केले आणि आरोपीला खात्री पटवून दिली की तो त्याच्या कटात यशस्वी झाला आहे. या कामात आरोपीच्या ‘एक्स पत्नीने’ही पोलिसांना पूर्ण सहकार्य केले.

काय आहे घटनाक्रम?

‘द सन’ च्या अहवालानुसार, टॅक्सी चालक अलेक्झांडर क्रासाविनला (Alexander Krasavin) त्याची घटस्फोटित पत्नी नीनाची (Nina) हत्या करायची होती. यासाठी त्याने एका सुपारी किलरला जबाबदारी दिली. कोणे एके काळी एकत्र जीवन-मरणाच्या शपथा घेतलेल्या जोडीदाराच्या मृत्यूसाठी आरोपीने तब्बल 13 हजार पौंड (जवळपास साडे तेरा लाख रुपये) किमतीला सौदा केला. अलेक्झांडरने काँट्रॅक्ट किलरला नीनाचा गळा चिरुन खून करण्यास सांगितलं होतं.

आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी प्लॅन

या कटाबद्दल पोलिसांना एका व्यक्तीकडून समजले आणि नीनासोबत त्यांनी एक योजना बनवली, जेणेकरुन आरोपीला रंगेहाथ पकडता येईल. पोलीस नीनाला सिनेमा मेकअप आर्टिस्टकडे घेऊन गेले. तिचा अशा प्रकारे मेकअप केला, की तिचा फोटो पाहून कोणीतरी तिचा गळा कापला आहे, असेच वाटेल. पोलिसांनी आधीच सुपारी किलरला अटक केली होती, पण नीनाच्या घटस्फोटित पतीला ते माहित नव्हते.

कसा क्रिएट केला क्राईम सीन

पोलिसांनी नीनाला कारमध्ये बसवले आणि तिचा खून झाल्यासारखा देखावा केला. यानंतर सुपारी किलरला तिचा एक फोटो काढून आरोपीला पाठवण्यास सांगण्यात आले. काम झाल्यानंतर, जेव्हा काँट्रॅक्ट किलर आरोपीकडून त्याचे उर्वरित पैसे घेण्यासाठी गेला, तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.

नीना म्हणाली, ‘माझा घटस्फोटित पती माझा जीव घेऊ इच्छित आहे हे समजल्यावर मला खूप मोठा धक्का बसला. जरी आम्ही घटस्फोट घेतला असला, तरी मला त्याच्याबद्दल आपुलकी होती.’

पतीने हत्येचा प्रयत्न का केला

पोलिसांनी सांगितले की, 54 वर्षीय टॅक्सी चालक अलेक्झांडर क्रासाविनने ही घटना घडवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. वास्तविक, अलेक्झांडरला त्याच्या पत्नीला पोटगी देण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने हा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या एका सहकाऱ्याला हे काम करण्यास सांगितले होते, पण त्याने नकार दिला. यानंतर, त्याने तिच्यावर दबाव टाकणे सुरु ठेवले, यामुळे सहकाऱ्याने पोलिसांपर्यंत पोहोचून संपूर्ण कहाणी सांगितली.

संबंधित बातम्या :

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची हत्या, काठीने मारहाण करुन डोक्यात फरशी टाकली

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याकडून कोल्हापुरात बलात्कार, अल्पवयीन मुलगी गरोदर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI