ट्रकच्या धडकेत बसचा चक्काचूर, 19 प्रवाशांचा मृत्यू

बस आणि ट्रकमध्ये टक्कर होऊन भीषण अपघात (TamilNadu Avinashi town bus  Accident) झाला. या अपघातात 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

TamilNadu Avinashi town Accident, ट्रकच्या धडकेत बसचा चक्काचूर, 19 प्रवाशांचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूच्या तिरपुर जिल्ह्यात केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बस आणि ट्रकमध्ये टक्कर होऊन भीषण अपघात (TamilNadu Avinashi town bus  Accident) झाला. या अपघातात 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तिरपुर जिल्ह्यातील अविनाशी या गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात 20 पेक्षा अधिक लोक जखमी असल्याचे बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास केरळ राज्य परिवहन मंडळाची एक बस कर्नाटकच्या बंगळुरुहून केरळच्या तिरुवनंतपुरम या ठिकाणी जात होती. यावेळी एक कंटेनर ट्रक कोयंबत्तूर-सलेम या महामार्गावरुन विरुद्ध दिशेने येत होता. यादरम्यान प्रवासी बस आणि कंटेनर ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

या बसमध्ये एकूण 48 प्रवासी प्रवास करत होते. यात 19 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकी प्रवाशी जखमी झाले. मृतांमध्ये 14 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त ट्रक आणि बसला क्रेनच्या मदतीने वेगळं करण्यात आलं. या अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह तिरुपूर जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले (TamilNadu Avinashi town bus  Accident) आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *