बाहुबली मुख्तार अंसारीच्या मृत्यूनंतर दिवंगत भाजपा आमदाराची पत्नी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला, कारण काय?

| Updated on: Mar 29, 2024 | 1:10 PM

"आम्ही खूप आनंदी आहोत. बाबाची कृपा आहे. महाराजा योगीजींचा आशीर्वाद मिळाला आहे. हा देवाने केलेला न्याय आहे. विरोधी पक्ष काही बोलेल. त्याने काही फरक पडत नाही" असं अलका राय म्हणाल्या.

बाहुबली मुख्तार अंसारीच्या मृत्यूनंतर दिवंगत भाजपा आमदाराची पत्नी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला, कारण काय?
krishnanand rai wife Alka
Follow us on

उत्तर प्रदेशचा माफीया डॉन मुख्तार अंसारीचा गुरुवारी रात्री कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. तुरुंगात अचानक त्याची तब्येत बिघडल्यानतंर त्याला बांदा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. मुख्तारच्या मृत्यूनंतर भाजपाचे दिवंगत आमदार कृष्णानंद राय यांच्या पत्नी आणि मुलाने काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. कृष्णानंद राय यांची पत्नी अलका राय आणि मुलगा पीयूष राय यांनी शुक्रवारी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन केलं. यावेळी अलका राय म्हणाल्या की, “आम्ही खूप आनंदी आहोत. बाबाची कृपा आहे. महाराज योगीजींचा आशीर्वाद मिळाला आहे. हा देवाने केलेला न्याय आहे. विरोधी पक्ष काही बोलेल. त्याने काही फरक पडत नाही. पंजाबच्या तुरुंगात बसून तो गुन्हे करायचा. पण यूपीमध्ये आल्यानंतर न्याय मिळाला. तो अत्याचारी होता, त्यांचा अंत झाला”

‘आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा असून दिवाळीपेक्षा कमी नाही’ असं पीयूषने म्हटलं. “बांदा जेलमध्ये मुख्तार अंसारीचा मृत्यू झाल्याच मला समजलय. या क्षणाला मी भगवान गोरखनाथ यांचे आभार मानीन. त्यांचा आशिर्वाद आमच्यावर आहे. जो जसा वागतो, त्याला त्याच तसं फळ मिळतं. देवाने निर्णय घेतलाय” असं पीयूष म्हणाला. मुख्तारवर कृष्णानंद राय यांच्या हत्येचा आरोप होता.

कृष्णानंद राय, मुख्तारमध्ये दुश्मनी का?

2002 च्या विधानसभा निवडणुकीत कृष्णानंद राय यांनी मुहम्मदाबादमधून सतत निवडणूक जिंकणारा मुख्तार अंसारीचा भाऊ अफजालला पराभूत केलं होतं. भाजपाच्या तिकीटावर कृष्णानंद राय निवडणूक जिंकले होते. त्यानंतर कृष्णानंद राय आणि मुख्तार अंसारी यांच्या शत्रुत्व वाढत गेलं.

कृष्णानंद राय यांच्या शरीरातून काढल्या 67 गोळ्या

29 नोव्हेंबर 2005 रोजी कृष्णानंद राय करीमुद्दीनपुर भागात सेनाड़ी गावात एका क्रिकेट मॅचच उद्घाटन करण्यासाठी गेले होते. हलका पाऊस असल्यामुळे त्यांनी बुलेटप्रूफ गाडीऐवजी सामान्य गाडी घेतली होती. संध्याकाळी घरी परतत होते. त्यावेळी त्यांना घेरून एके-47 रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. जवळपास 400 गोळ्या झाडल्या. कृष्णानंदसह सात लोकांचा मृत्यू झाला. कृष्णानंद राय यांच्या शरीरातून 67 गोळ्या काढण्यात आल्या.