‘नागास्त्र-1’ ने उडवली पाकिस्तानची झोप, आता येणार ‘नागास्त्र-2’ आणि ‘नागास्त्र-3’, किती खतरनाक आहेत हे स्वदेशी बनावटीचे ड्रोन?

नागास्त्र 2 आणि नागास्त्र 3 देखील विकसित करण्यात आले आहेत. भारताचे हे दोन स्वदेशी ड्रोन 'नागास्त्र-1' पेक्षा अधिक अद्ययावत असणार आहेत. सध्या हे दोन्ही ड्रोन ट्रायल फेजमध्ये आहेत.

नागास्त्र-1 ने उडवली पाकिस्तानची झोप, आता येणार नागास्त्र-2 आणि नागास्त्र-3, किती खतरनाक आहेत हे स्वदेशी बनावटीचे ड्रोन?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 22, 2025 | 8:34 PM

भारतीय संरक्षण प्रणाली आता कात टाकत आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले तर 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतून लावला, पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि मिसाईल पाडले, प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यामध्ये भारताच्या स्वदेशी ड्रोन ‘नागास्त्र-1’ ने महत्त्वाची भूमिका बजावली, भारताचं स्वदेशी ड्रोन असलेलं ‘नागास्त्र-1’ याचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला.

दरम्यान आता यानंतर भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. डीआरडीओ आता नागास्त्र 2 आणि नागास्त्र 3 ची निर्मिती करत आहेत. डीआरडीओ आणि नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीजने संयुक्तपणे विकसीत केलेलं ‘नागास्त्र-1’हे भारतातील पहिला स्वदेशी आत्मघाती ड्रोन आहे. भारतानं जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये देखील या ड्रोनचा वापर करण्यात आला होता. हे ड्रोन अचूकपणे लक्ष्यापर्यंत पोहोचते आणि स्फोट घडवून आणते, यामुळे शत्रूंवर अचूकपणे मारा करता येतो. वजनाने हलके जीपीएस आधारित लक्ष्यीकरण, आणि स्फोटकं वाहून नेण्याची उच्च क्षमता ही या ड्रोनची वैशिष्ट आहेत.

दरम्यान आता नागास्त्र 2 आणि नागास्त्र 3 देखील विकसित करण्यात आले आहेत. भारताचे हे दोन स्वदेशी ड्रोन ‘नागास्त्र-1’ पेक्षा अधिक अद्ययावत असणार आहेत. सध्या हे दोन्ही ड्रोन ट्रायल फेजमध्ये आहेत. हे दोन्ही ड्रोन एआय बेस्ड टारगेट ओळखण्यास सक्षम असणार आहेत. याचवर्षी भारतीय सैन्याच्या सेवेत हे दोन्ही ड्रोन दाखल होण्याची शक्यता आहे. या ड्रोनमुळे भारताची संरक्षण प्रणाली अधिक मजबूत होणार आहे, शत्रूंच्या ठिकाणांवर अधिक अचूकपणे आपल्याला मारा करणं सहज शक्य होणार आहे. शत्रू मोठं नुकसान करण्याची क्षमता या स्वदेशी ड्रोनमध्ये आहे.