रेल्वेचे फायद्याचे गणित, तोट्यात येताच स्लीपर कोचमध्ये पुन्हा बसू लागले वेटिंग तिकीटधारक

Sleeper Coach Waiting List: स्लीपर क्लासमध्ये जेव्हा अनऑथराइज्ड पॅसेंजर्सची एंट्री बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वेच्या महसूलमध्ये मोठी घट झाली. रेल्वेचे तिकीट चेकींग स्टॉफ जे दंड करतात त्यांचे 80 टक्के उत्पन्न कमी झाले.

रेल्वेचे फायद्याचे गणित, तोट्यात येताच स्लीपर कोचमध्ये पुन्हा बसू लागले वेटिंग तिकीटधारक
Sleeper Coach
| Updated on: Jan 13, 2025 | 10:24 AM

Sleeper Coach Waiting List: भारतीय रेल्वेने वेटिंग तिकीटधारक प्रवाश्यांना स्लीपर क्लासमधून प्रवास करण्याची परवानगी नाकारली. यासंदर्भात नियम आधीपासून होता. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. जुलै २०२४ पासून त्या नियमाचे पालन करणे सुरु केले होते. परंतु आता पुन्हा रेल्वेच्या स्लीपर क्लासमध्ये वेटिंग तिकीटधारक दिसू लागले आहे. त्याला कारण रेल्वेच्या फायद्याचे गणित आहे.

रेल्वेच्या जनरल तिकीटाने किंवा वेटिंग तिकीटधारक स्लीपर क्लासमधून प्रवास केल्यावर पेनाल्टी आणि इतर काही चार्ज लावले जातात. त्यामुळे रेल्वेच्या कमाईचे हे मोठे साधन आहे. कारण या एक्स्ट्रा पॅसेंजरसाठी रेल्वेला काही वेगळी व्यवस्था करावी लागत नाही. परंतु त्या माध्यमातून कोट्यवधीची रक्कम मिळते. तिकीट चेकींग स्टाफ त्यांच्याकडून जास्त भाडे आणि दंड वसूल करत असतो.

80 टक्के उत्पन्न कमी

रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्लीपर क्लासमध्ये जेव्हा अनऑथराइज्ड पॅसेंजर्सची एंट्री बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वेच्या महसूलमध्ये मोठी घट झाली. रेल्वेचे तिकीट चेकींग स्टॉफ जे दंड करतात त्यांचे 80 टक्के उत्पन्न कमी झाले. त्यामुळे पुन्हा त्या लोकांना स्लीपर कोचमध्ये बसू दिले जात आहे. रेल्वेचे तिकीट चेकींग स्टॉफकडून सांगितले जात की, अनऑथराइज्ड पॅसेंजरच उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. जेव्हा त्यांना स्लीपर कोचमध्ये बसू दिले जात नव्हते तेव्हा टारगेट पूर्ण होत नव्हते. त्यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय गेला. त्यानंतर जुनीच व्यवस्था लागू करण्याचा निर्णय झाला.

रेल्वेतील स्लीपर कोचमध्ये 72 बर्थ असतात. त्यात अनेकवेळा 150 पॅसेंजर बसलेले दिसतात. ज्याला जिथे जागा मिळेल, त्या ठिकाणी तो बसतो. अनेक जण शौचालयाजवळ बसून प्रवास करतात. या सर्वांचा परिणाम जे अनेक दिवसांपूर्वी कन्फर्म तिकीट काढून प्रवास करतात त्या प्रवाशांवर होतो. त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. परंतु रेल्वेकडून त्यांच्या फायद्याच्या गणितामुळे स्लीपर कोचच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे.