
अहमदाबादच्या अदाणी विद्या मंदिर या शाळेने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत पण गुणवान विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने राष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान पटकावले आहे. नुकत्याच मिळालेल्या NABET मानांकनात अदाणी विद्या मंदिर या शाळेने उत्कृष्ट गुण मिळवले आहेत. यासोबतच CBSE बारावी बोर्डाच्या परीक्षेतही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे.
AVMA ला नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (NABET) कडून मानांकन मिळाले आहे. यात 250 पैकी 232 गुणांची प्रभावी कामगिरी शाळेने नोंदवली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या संस्थेच्या ध्येयाला या यशामुळे अधिक बळ मिळाले आहे.
अहमदाबादमधील अदाणी विद्या मंदिर या शाळेसाठी 13 मे 2025 हा दिवस दुहेरी आनंदाचा ठरला आहे. CBSE 12वी बोर्डाच्या परीक्षेत शाळेतील सर्वच्या सर्व 95 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. अदाणी विद्या मंदीरचा निकाल 100 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत बाजी मारली. एल्बिना रॉयने या विद्यार्थिनीने ह्यमुनिटिस शाखेत 97.6 टक्के गुण मिळवले आहेत. जय बवास्कर या विद्यार्थ्याला विज्ञान शाखेत 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. NABET च्या सन्मानानंतर CBSE मधील या शानदार कामगिरीमुळे शाळेची मान अभिमानाने उंचावली आहे.
No Fees! No Limits!
It was said that they were born with fewer chances. But they studied harder and dreamed bigger!
Our Adani Vidya Mandir Ahmedabad was just ranked among India’s top schools with 100% CBSE results. Proof that when belief meets opportunity, magic happens!
Also,… pic.twitter.com/jo4B1o4NJB
— Gautam Adani (@gautam_adani) May 15, 2025
यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये अहमदाबादमधील अदाणी विद्या मंदिर शाळेला ‘समग्र शिक्षा पुरस्कार’ अंतर्गत ‘नॅशनल विनर’ चा किताब मिळाला होता. वंचित आणि शिक्षणाचा हक्क असलेल्या (RTE) श्रेणीतील योगदानासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अहमदाबादमधील अदाणी विद्या मंदिरच्या शिक्षण पद्धतीत शाश्वत विकास लक्ष्यांचा (SDGs) समावेश आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर जागतिक दृष्टिकोन आणि जीवनातील आवश्यक कौशल्येही मिळतात.
अहमदाबादमधील अदाणी विद्या मंदीरसोबतच अन्य अदाणी विद्या मंदिर शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘इंटरनॅशनल ग्रीन स्कूल अवॉर्ड’ आणि ‘काइंडनेस स्कूल’ सारखे पुरस्कार प्राप्त केले आहेत. अदाणी विद्या मंदिराचे अहमदाबाद, भद्रेश्वर, सुरगुजा आणि कृष्णपट्टनम या ठिकाणी चार कॅम्पस आहेत. यात 3,000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.