Neha Bora: ‘मी स्त्री नाही’, नेहा बोरा हिच्या वक्तव्याने उंचावल्या सर्वांच्या भुवया, म्हणाल्या काय?

Neha Bora Big Statement: अनेक राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील चर्चेतील चेहरा नेहा बोरा यांचे एक वक्तव्य सध्या गाजत आहे. 'मी स्त्री नाही' या त्यांच्या वक्तव्यामागील मत त्यांनी स्पष्ट केले आहे. त्या स्वतःला नॉन बायनरी मानतात.

Neha Bora: मी स्त्री नाही, नेहा बोरा हिच्या वक्तव्याने उंचावल्या सर्वांच्या भुवया, म्हणाल्या काय?
'मी स्त्री नाही', नेहा बोरा म्हणाल्या काय?
| Updated on: Nov 13, 2026 | 12:10 PM

Neha Bora Big Statement: सामाजिक आणि राजकीय आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून नेहा बोरा हा चेहराही चर्चेत आहेत. त्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) नेत्या आहेत. त्यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी त्यांची लिंग ओळख करून देताना, आपण स्त्री नाही तर नॉन बायनरी असल्याचा दावा केला आहे. त्या स्वतःला महिला अथवा पुरूष मानत नाहीत. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

काय दिली नेहा बोरा यांनी प्रतिक्रिया?

Loading...

एका मुलाखतीत त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. माध्यमातून त्यांची ओळख अनेकदा महिला अथवा इंग्रजीतून त्यांना She/Her अशा सर्वनामांनी संबोधले जाते. त्यावर त्यांना काय वाटते? याची माहिती त्यांनी दिली. अशा गोष्टी घडतात, कारण की लोकांना याविषयीची माहिती नसते. अनेकदा त्यांना लोक ती अथवा ते असे आदारार्थी, सर्वनामांनी संबोधतात. समाज आणि माध्यमांना नॉन बायनरी व्यक्तीशी कसा संवाद साधावा हे समजण्यासाठी थोडा वेळ लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

नॉन-बायनरी म्हणजे काय?

नॉन-बायनरी व्यक्ती ही ट्रान्सजेंडर या समुदायाहून वेगळी असते. या व्यक्तीची लैंगिक ओळख केवळ स्त्री अथवा पुरूष या दोन घटकांपुरती मर्यादित नसते. काही लोक स्वतःला स्त्री अथवा पुरूष अशा दोन्ही रूपात पाहतात. तर काही जण स्वतःला स्त्री अथवा पुरूष न मानता एक स्वतंत्र व्यक्ती मानतात. ते स्वतःला कोणत्याही ठराविक लिंगभेदाच्या चौकटीत बसवत नाहीत. नेहा बोरा या स्वतःला स्त्री अथवा पुरूष या दोन्ही पारंपारिक ओळखीपेक्षा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहतात. नेहा बोरा या उत्तराखंडमधून येतात. दिल्ली विद्यापीठातील शिक्षणानंतर त्या सध्या जेएनयूमध्ये पीएचडी करत आहेत. जंतरमंतरवरील आंदोलनासह इतर ठिकाणच्या आंदोलनापासून देशभरात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आंदोलनातील आक्रमक भाषणं आणि भूमिकेमुळे त्या चर्चेत असतात. आता त्यांच्या या नवीन वक्तव्याने अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us