AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America Tariff : टॅरिफ वॉर सुरू असतानाच भारताचा मोठा निर्णय, आता या देशाकडून खरेदी करणार कच्चे तेल

भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून, अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आले आहे, टॅरिफ वॉर सुरू असतानाच कच्च्या तेलाच्या खरेदी संदर्भात आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे.

America Tariff : टॅरिफ वॉर सुरू असतानाच भारताचा मोठा निर्णय, आता या देशाकडून खरेदी करणार कच्चे तेल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2025 | 1:24 PM
Share

भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, यासाठी आता अमेरिकेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे, आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र तरी देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे, दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला अमेरिकेनं एच -1 बी व्हिसावरील शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे, आता एच 1 बी व्हिसासाठी तब्बल एक लाख डॉलर म्हणजे 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत, याचा जगात सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. दरम्यान टॅरिफ वॉर सुरू असतानाच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे.

भारत रशियासह अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करतो, यामध्ये आता आणखी एका देशाचं नाव जोडलं गेलं आहे. अजरबैजानने दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा भारताला तेलाची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीवरून वाद होता, हा वाद संपल्यानंतर आता दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा अजरबैजानकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू झाला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. अजरबैजाननच्या सीमा शुल्क डेटानुसार ऑगस्ट 2024 मध्ये भारताला 1,747.07 टन कच्च्या तेलाची निर्यात करण्यात आली होती, या कच्च्या तेलाची किंमत जवळपास 7,81,520 डॉलर इतकी होती.

दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सामंजस्य करार

ऊर्जा सामंजस्य करार हा दोन्ही देशांमधील आर्थिक देवान -घेवाणीचा प्रमुख आधार आहे. 2024 मध्ये भारत हा अजरबैजानकडून पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणारा जगातील चौथा सर्वात मोठा खरीददार देश आहे. या काळात भारतानं अजरबैजानकडून 11.7 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली ज्याची किंमत जवळपास 72.9 कोटी डॉलर इतकी होती. तर 2022- 2023 या वर्षामध्ये भारत हा अजरबैजानकडून पेट्रोलियम आणि पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा खरेदीदार देश होता. भारतानं या काळात अजरबैजानकडून तब्बल 20 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली होती. ज्याची किंमत जवळपास 1.6 अब्ज डॉलर इतकी होती.

भारताची गुंतवणूक

भारतानं केवळ अजरबैजानकडून तेलाची खरेदीच केलेली नाही तर, या देशात भारतानं मोठी गुंतवणूक देखील केलेली आहे. बाकूमध्ये असलेल्या भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार भारताच्या ओएनजीसीएलने अजरबैजानच्या अजेरीज चिराग -गुनाशाली तेल आणि गॅस प्रकल्पामध्ये तब्बल 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...