AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक..

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. भारताचं आणखी एक जहाज सुरक्षितपणे स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून बाहेर पडलं आहे. हे जहाज विशाखापट्टनमच्या दिशेनं येत आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक..
strait of hormuzImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 6:10 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामानंतरही संघर्ष सुरूच आहे. इरानने युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं होतं. दरम्यान त्यानंतर अमेरिकेने देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. सध्या हा मार्ग व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसला आहे. कारण स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे आखाती देशांमधून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र याचदरम्यान आता भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताच्या आणखी एका जहाजानं स्ट्रेट ऑफ होर्मुज पार केलं आहे. हे जहाज कच्चं तेल घेऊन भारताकडे निघालं आहे. मेरिटाइम ट्रान्सपोर्टची नोंद ठेवणाऱ्या एका वेबसाइटकडून ही माहिती देण्यात आली आहे. निसोस केरोस असं या जहाजाचं नाव आहे. हे जहाज भारताच्या विशाखापट्टनमच्या दिशेनं येत आहे. 3 जूनपर्यंत जहाज भारतीय बंदरात दाखल होण्याची शक्यात आहे.

21 मे रोजी शारजहावरून झालं रवाना

हे जहाज 21 मे रोजी शारजाहावरून रवाना झालं आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजता या जहाजाला भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्याजवळ अरबी समुद्रात पहाण्यात आलं. जहाजांची माहिती ठेवणाऱ्या एका संस्थेच्या मते हे जहाज विशाखापट्टनमच्या दिशेनं जात आहे. हे जहाज 333 मीटर एवढं लाबं आहे. दरम्यान हे जहाज आता 3 जूनपर्यंत विशाखापट्टनमला पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजामुळे भारताला काही प्रमाणात का होत नाही परंतु दिलासा मिळणार आहे.

24 तासांमध्ये 23 जहाजांना परवानगी

इराणनची वृत्तसंस्था IRNA च्या एका रिपोर्टनुसार इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नं गेल्या 24 तासांमध्ये 23 कमर्शियल जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाण्याची परवानगी दिली आहे. ज्यामध्ये तेल जहाज आणि कंटेनरचा समावेश आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून गेल्या 24 तासांमध्ये जे 23 व्यापारी जहाजं पार झाले आहेत, त्यांनी आधी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर त्यांना या मार्गाने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या जहाजांकडून इराणने टोल वसूल केला की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा