AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचा विरोध करतो, पण कुठलाही… ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा; नेमकं काय म्हणाले?

Asaduddin Owaisi On Elon Musk: ओवैसींची एलन मस्क यांना ठाम संदेश दिला आहे. मोदीविरोध करणार, पण भारताच्या कारभारात परकीय हस्तक्षेप सहन करणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

मोदींचा विरोध करतो, पण कुठलाही... ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा; नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Oct 16, 2026 | 6:32 PM
Share

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एलोन मस्क यांनी भारताच्या राजकीय आणि व्यावसायिक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर ओवैसी यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. ओवैसी यांची ही भूमिका आश्चर्यकारक आहे. कारण त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारविरोधात अनेकदा आवाज उठवला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी हे स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्याचा अर्थ असा नाही की ते कोणत्याही बाहेरील श्वेतवर्णीय व्यक्तीला भारताच्या राजकीय सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू देतील. आम्ही नेहमीच नरेंद्र मोदींच्या विरोधात राहिलो आहोत . आम्ही यापुढेही राहू, पण मस्क आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशा गोष्टी कशा लिहू शकतात? ओवैसी यांनी अलीकडेच एसआयआर संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यानंतर ओवैसींनी भाजपवर ठपका ठेवला. त्यांनी विचारले की, जो पक्ष नेहमी राष्ट्रवादाबद्दल बोलतो, तो पक्ष जेव्हा एक शक्तिशाली परदेशी उद्योगपती देशाच्या निर्णयांना आव्हान देतो, तेव्हा प्रतिक्रिया देण्यास का कचरत आहे? खेदाची गोष्ट म्हणजे भाजप आणि मोदी सरकार गोऱ्या लोकांना इतके का घाबरतात? असा सवाल त्यांनी केला आहे. स्पेसएक्सचे मालक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी त्यांच्या स्टारलिंक या उपग्रह कंपनीला भारतात व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची परवानगी मिळण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल जाहीरपणे तक्रार केली, तेव्हा हे प्रकरण अधिकच चिघळले आहे.

राहुल गांधींनी मस्क यांना पाठिंबा देऊन प्रत्युत्तर दिले. आता ओवैसी यांनी याला राष्ट्रवादाची कसोटी म्हणत भाजपवर हल्ला चढवला आहे. त्यांनी असेही म्हटले की, या मुद्द्याला पाठिंबा देणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या राजकारणाला पाठिंबा देणे नव्हे. यावर सरकारने म्हटले आहे की, तीन परवानाधारक उपग्रह संचार कंपन्या स्टारलिंक, रिलायन्स जिओचा उपग्रह उपक्रम आणि भारत-समर्थित युटेलसॅट वनवेब यांचे सुरक्षा ऑडिट सुरू आहे. या सर्व कंपन्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आहेत. जोपर्यंत सुरक्षा ऑडिट किंवा स्पेक्ट्रम मंजुरी पूर्ण होत नाही, तोपर्यंत यापैकी कोणतीही कंपनी व्यावसायिक सेवा सुरू करू शकत नाही.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?