दिग्विजय सिंह बोलले; तर काँग्रेस शून्य होणार; म्हणाले…

| Updated on: Sep 29, 2022 | 7:42 PM

काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत बोलताना त्यांनी हेही सांगितले की, अशोक गहलोत यांच्या जागी मी अधिकृत उमेदवार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिग्विजय सिंह बोलले; तर काँग्रेस शून्य होणार; म्हणाले...
Follow us on

नवी दिल्लीः दिग्विजय सिंह (Digvijay Singh) आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आहे. आताही त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत (Congress President Election 2022) वक्तव्य केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधान आले आहे. दिग्विजय सिंह यांनी अशोक गहलोतांचा वाद टोकाला गेल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्जही (Application for candidacy) खरेदी केला आहे. त्यामुळे उद्याते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज खरेदी केल्यानंतर आणि अर्ज दाखल करण्याआधीच खासदार दिग्विजय सिंह यांनी नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस शून्य आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

दिग्विजय सिंह यांनी अर्ज दाखल केला नसला तर त्यांच्याबरोबर शशी थरुर यांचेही नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्या या विधानाचा राजकीय विश्लेषकांनी अनेक अर्थ काढले आहेत.

अशोक गहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, गहलोत हे आमचे अधिकृत उमेदवार असू शकतात असं आतापर्यंत तरी वाटत होते. तरीही ते निवडणुकीत उभा राहिले असले तरी आम्ही त्यांच्याकडे आदरानेच पाहणार असंही त्यांनी सांगितले.

राजस्थानातील राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी ती तिथेच टाळली गेली पाहिजे होते, ती वाढल्यानेच राजकारणात ही वेगळी समस्या निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत बोलताना त्यांनी हेही सांगितले की, अशोक गहलोत यांच्या जागी मी अधिकृत उमेदवार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत उतरण्याचा माझा वैयक्तिक निर्णय असून मी माझ्या स्वतःच्या विवेकबुद्धीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे सांगितले आहे.