Assembly Election Exit Poll 2026: आसाम, पश्चिम बंगालसह केरळमपर्यंत… कुणाच्या भाळी विजयाचा टिळा, टीव्ही 9 वर 5 राज्यांचे पोल ऑफ पोल्स पाहा
Assembly Election Exit Poll 2026: आसाम, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे मतदान झाले आहे. तर पश्चिम बंगाल राज्यात दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे. मतदान संपल्यानंतर लागलीच विविध संस्थांचे एक्झिट पोल जारी होतील. यावेळी टीव्ही 9 पोल ऑफ पोल्स जाहीर करणार आहे.

Assembly Election Exit Poll 2026: आसाम, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे मतदान प्रक्रिया झालेली आहे. तर पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज संपेल. त्यानंतर लागलीच एक्झिट पोल समोर येतील. विविध संस्थांचे त्यांचे कौल जाहीर करतील. या राज्यातील निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी मतमोजणीनंतर समोर येतील. अर्थात त्यापूर्वी आज संध्याकाळी एक्झिट पोल समोर येतील. यावेळी टीव्ही 9 पोल ऑफ पोल्स जाहीर करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात येतात. पाच राज्यांपैकी चार राज्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर पश्चिम बंगालमधील 142 जागांवरील मतदान प्रक्रिया आज संपेल. त्यानंतर अनेक संस्था एक्झिट पोल जाहीर करतील. बंगालमधील मतदान बाकी असल्याने या संस्थांनी अजून एक्झिट पोल जाहीर केलेला नाही.
टीव्ही 9 वर पोल ऑफ पोल्स
अनेकदा एक्झिट पोलचाही अंदाज चुकल्याचे स्पष्ट झाले आहे. एक्झिट पोलची आकडेवारी जुळली नसल्याचे आणि एक्झिट पोल खोटा ठरल्याचेही समोर आलेले आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीसारख्या राज्यात हे अगोदर दिसले आहे. त्यामुळे टीव्ही 9 यावेळी पोल ऑफ पोल्स दाखवणार आहे. त्यासोबतच टीव्ही 9 नेटवर्क हे विविध एजन्सींचा अंदाजही दाखवेल.
मत आणि कौल यात काय अंतर?
Opinion Poll हा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी घेतला जातो. यामध्ये मतदानापूर्वी लोकांचा कल काय आहे, याचा अंदाज घेतला जातो. मतदारांचे मत जाणून घेतल्या जाते. तर एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कौल कुणाला हे तपासले जाते. निवडणूक संपल्यानंतर ते जाहीर केल्या जाते. ओपिनियन पोल एक प्री पोल सर्व्हे असतो. निवडणूक घोषणेपूर्वी ते दाखवण्यात येते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि आचार संहिता जाहीर होताच ओपिनियन पोलवर बंदी घातली जाते.
केव्हा दाखवणार एक्झिट पोल?
Exit Poll मतदान संपल्यानंतर दाखवण्यात येतील. पश्चिम बंगालच्या दुसऱ्या म्हणजे अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर धडाधड एक्झिट पोल जाहीर होतील. आज पश्चिम बंगालमध्ये सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवण्यास बंदी असेल. त्यानंतर एक्झिट पोलचा पोळा फुटेल.
देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही 9 नेटवर्कची वृत्त वाहिनी, संकेतस्थळ, युट्यूब आणि सोशल मीडियानवर एक्झिट पोल दिसतील. पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लागलीच पाच राज्यातील विधानसभा निवडणूक संपेल. त्यानंतर लागलीच एक्झिट पोल दाखवण्यास सुरुवात होईल. टीव्ही 9 पोल ऑफ पोल्स दाखवणार आहे. त्यातून मतदारांचा कल समोर येईल.