सावधान! माचिसच्या काडीपासून एटीएम पिन चोरी

नवी दिल्ली: दिल्लीतील एटीएम फ्रॉडच्या वाढत्या घटनांमुळे नागिरकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. काही अट्टल गुन्हेगारांच्या टोळक्यांकडून एटीएम फ्रॉड करण्यात येत आहेत. एटीएम हॅक करुन एकाचवेळी अनेकांना चुना लावल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. माचिस काडीपासून एटीएम पिन कॉपी काही तज्ञांच्या मते, एटीएममधील पैसे लुटण्यासाठी माचिस काडी, ग्लू स्टिक, थर्माकॉल, स्कीमर आणि शोल्डर सर्फिंग (मागे उभं राहून पिन कॉपी करणे),स्लिक ट्रिक  …

सावधान! माचिसच्या काडीपासून एटीएम पिन चोरी

नवी दिल्ली: दिल्लीतील एटीएम फ्रॉडच्या वाढत्या घटनांमुळे नागिरकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. काही अट्टल गुन्हेगारांच्या टोळक्यांकडून एटीएम फ्रॉड करण्यात येत आहेत. एटीएम हॅक करुन एकाचवेळी अनेकांना चुना लावल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत.

माचिस काडीपासून एटीएम पिन कॉपी

काही तज्ञांच्या मते, एटीएममधील पैसे लुटण्यासाठी माचिस काडी, ग्लू स्टिक, थर्माकॉल, स्कीमर आणि शोल्डर सर्फिंग (मागे उभं राहून पिन कॉपी करणे),स्लिक ट्रिक  अॅट पाउच आणि स्लिक ट्रिक कॅश डिस्पेंसरसह इतर गोष्टींचा वापर केला जातो.

“दिल्लीमधील पीएनबी एटीएम हॅक घटनेत स्कीमर ट्रिकचा वापर केला होता. एटीएम फ्रॉडसाठी स्कीमरचा वापर सध्या जास्त केला जातो”. असा दावा सायबर तज्ञ प्रबेश चौधरी यांनी केला आहे.

कशी होते स्कीमरच्या आधारे फसवणूक?

एटीएम क्लोनिंगच्या माध्यमातून ही चोरी केली जाते. पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडील एटीएम घेऊन, ब्लँक कार्डद्वारे त्याचं क्लोनिंग केलं जातं. यासाठी एका डिव्हाईसची मदत घेतली जाते. तुमच्या एटीएमवरील डेटा क्लोनद्वारे ब्लँक कार्डवर घेतला जातो. त्यानंतर फ्रॉड कॉलच्या माध्यमातून त्याचा पिन मिळवला जातो किंवा एटीएममध्ये मागे उभे राहून तुमचा पिन पाहिला जाऊ शकतो, असं सायबर सिक्युरिटी एजन्सीचे मनीष कुमावत यांनी सांगितलं.

कुमावत म्हणाले, “बऱ्याचवेळा युजर एटीएम मशीनवर ट्रान्झॅक्शन करायला जातो, कार्ड स्वाईप करतो, मात्र पिन टाकल्यावर ट्रान्झॅक्शन फेल दाखवते. मग काही वेळाने ट्रान्झॅक्शन यशस्वी झाल्याचा मेसेज तुम्हाला फोनवर येतो. या साऱ्या गोष्टी स्कीमर डिव्हाईसच्या माध्यमातून केल्या जातात. या डिव्हाईसमुळे एटीएम क्लोन होते, शिवाय फेक पॅडद्वारे तुम्ही टाकलेला पिन नंबर मिळवला जातो.”

काय काळजी घ्याल?

सायबर तज्ञांच्या मते, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये काही त्रास नाही, ऑनलाईन पद्धतीचा वापर करु शकता. मात्र युजर्सने कार्ड स्वाईप करताना थोडी सावधानाता बाळगावी. मशीनमध्ये कार्ड जात नसेल तर चेक करा, तिथे डुप्लिकेट मशीन नाही ना, तसेच वर किंवा आपल्या मागे कॅमेरा तर नाही या सर्व गोष्टी निरखून पाहाव्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *