राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; पोलिसांकडून तिघांना क्लिनचिट, कारण काय?

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणा मोठी अपडेट समोर आली आहे. उत्तर पोलिसांकडून तिघांना क्लिनचिट देण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेल्या क्लिनचिटचे कारण देखील समोर आले आहे.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; पोलिसांकडून तिघांना क्लिनचिट, कारण काय?
ram mandir
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 11:36 AM

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमधून चोरीचा घटनाक्रम समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातून माजी महासचिव चंपत राय , अनिल मिश्रा, गोपाल राव याना क्लिनचीट देण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांची नोंद साक्षीदार म्हणून केली आहे.

चार्जशीटमध्ये ही देगणी कशी चोरली गेली, याची माहिती आहे. तसेच चोरी घटना ते पोलिसांच्या कारवाईचा क्रम आहे. पोलिसांच्या चार्जशीटनुसार, 3 जून रोजी सर्वात आधी अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, अनुकल्प मिश्रा, लव कुश मिश्रा यांना चोरी करताना आढळून आले. तर मदत गोपाल निगमला लोकांनी दिलेल्या नोटांचे बंडल चोरताना आढळला. हा चोरीचा प्रताप 4 जून रोजी उघडकीस आला. अविनाश शुक्ला याला चोरी करताना संत प्रसादने पाहिलं. त्यानंतर मदत गोपाल निगम , संत प्रसाद वर्माने गेटवर तपासणी सुरू केली. अविनाश शुक्लाने 2 लाख 25 हजार रुपये बाथरुममध्ये चोरी केले होते. झडती घेतल्यानंतर ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

4 जून रोजी रात्री दिल्लीहून ट्रेनने अयोध्या येणार्‍या चंपत राय यांना चोरीची माहिती देण्यात आली. त्यांना चोरीचे व्हिडिओ पाठवण्यात आले. 5 जून रोजी अयोध्या येथे पोहोचल्यानंतर चंपत राय यांनी कारसेवकपुरम येथील निवासस्थानी अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांची बैठक झाली. या बैठकीत लॅपटॉपवर चोरी करतानाचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ दाखवण्यात आले. चंपत राय यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्याचे चार्जशीटमध्ये नमूद आहे. त्यानंतर चंपत राय यांनी एक विधान केलं होतं.

7 जून रोजी केलेल्या विधानाचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे. त्यांनी म्हटलं होतं की, श्री रामजन्मभूमीचं वेळोवेळी ऑडिट होतं. यात ट्रस्ट आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी असतात. ऑडिटचं काम अनेक दिवसांपासून सुरू असते. त्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु त्यांनी चोरीबाबत भाष्य केलं नव्हतं. या संपूर्ण चोरीचा घटनाक्रम या चार्जशीटमध्ये नमूद आहे.  पुढे देणगी चोरी प्रकरणात 13 जून रोजी उत्तर प्रदेशात सरकारने तीन सदस्यीय एसआयटी गठीत केली होती. यानंतर या प्रकरणाचे अनेक माहिती समोर आली. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये चंतप राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना आरोपी बनवण्यात आलेलं नही. त्यांना या प्रकरणात साक्षीदार बनवलं आहे. तर या प्रकरणी 8 आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us