AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Azadi Ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्याच्या 90 वर्षांपूर्वी बरेली एक वर्षासाठी झाले होते स्वातंत्र्य; फाशीपूर्वी खान बहादूर खान म्हणाले हा माझा विजय

पहिल्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान देशातील अनेक भाग स्वातंत्र्य झाले होते. मात्र हे स्वातंत्र्य अल्पायुषी ठरले. यातील अनेक भागांचे स्वातंत्र हे 15 दिवसांपेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही. मात्र बरेली पूर्ण वर्षभर स्वातंत्र्य होते.

Azadi Ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्याच्या 90 वर्षांपूर्वी बरेली एक वर्षासाठी झाले होते स्वातंत्र्य; फाशीपूर्वी खान बहादूर खान म्हणाले हा माझा विजय
| Updated on: Aug 01, 2022 | 6:25 PM
Share

पहिल्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान देशातील अनेक भाग स्वातंत्र्य झाले होते. मात्र हे स्वातंत्र्य अल्पायुषी ठरले. यातील अनेक भागांचे स्वातंत्र हे 15 दिवसांपेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही. इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झालेल्या या प्रदेशांवर पुन्हा एकदा इंग्रजांनी कब्जा केला. मात्र भारतात तेव्हा असे देखील एक संस्थान होते, ज्या संस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढील वर्षभर या संस्थानावर इंग्रजांना कब्जा मिळवता आला नव्हता. त्या संस्थानाचे नाव होते बरेली (Bareilly). 10 मे 1857 रोजी मेरठमध्ये (Meerut) क्रांतिची ठिणगी पडली आणि क्रांतिकारकांनी उठाव केला. पुढे या उठावाचे रुपांतर स्वातंत्र्यलढ्यात झाले. यालाच 1857 चा उठाव असे म्हणतात. दरम्यान अवघ्या चारच दिवसांत हा उठाव बरेलीपर्यंत जाऊन पोहोचला. या दरम्यान अनेक इग्रजांचे अधिकारी मारले गेले तर अनेक जण पळून गेले. या लढ्यात क्रांतिकारकांचे नेतृत्व करणाऱ्या खान बहादुर खान (Khan Bahadur Khan) यांना बरेलीचा नवाब घोषित करण्यात आले. आज आपण खान बहादुर खान यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

रुहेला सरदारांचे वंशज

बरेलीमधून क्रांतीचं रणशिंग फुंकणारे खान बहादुर खान हे रुहेला घराण्याचे वंशज होते, ते सरदार हाफिज रहमत यांचे नातू होते. खान बहादुर खान यांचा जन्म 1791 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झुल्फिकार अली खान असे होते. वडिलांच्या निधनानंतर ते बरेलीच्या भूड परिसरात स्थायिक झाले. त्यांनी काही काळ ब्रिटिश सरकारमध्ये न्यायाधीश म्हणूनही काम केले होते.

इंग्रजांना इशारा

1857 च्या उठावाची तयारी झाली होती. बरेलीमध्ये खान बहादुर खान यांच्या घरी क्रांतिकारकांच्या बैठकी होत असत. ते काही काळ इंग्रजांच्या सरकारमध्ये न्यायाधीश असल्याने त्यांनी याबाबत इंग्रज सरकारला इशारा दिला होता. कमिशनरची भेट घेऊन इंग्रजांनी बरेली सोडून जावे असे सांगितले होते. अन्यथा होणाऱ्या बंडाची कल्पना देखील त्यांनी इंग्रजांना दिली होती. क्रांतिकारकांच्या संतापाचा कडेलोट होण्याआधीच तुम्ही बरेली सोडा तर तुमचे प्राण वाचू शकतात असे देखील खान बहादुर खान यांनी म्हटले होते. मात्र इंग्रजांनी खान बहादुर खान याचं न ऐकल्यामुळे शेवटी 31 मे रोजी बरेलीमध्ये क्रांति६कारकांनी उठाव केला. या उठावात अनेक इंग्रजांचे अधिकारी मारले गेले. तर काही बरेली सोडून पळून गेले. आणि बरेली स्वांतत्र्य झाली. त्यानंतर खान बहादुर खान यांना बरेलीचा नवाब घोषित करण्यात आले.

खान बहादुर खान यांना बरेलीमधून अटक

बरेलीचे संस्थान इग्रजांच्या हातून गेले होते, हा इग्रजांसाठी मोठा धक्का होता. इंग्रज अधिकारी सुडाच्या भावनेने पेटून उठले होते, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा बरेली संस्थानावर कब्जा करायाचा होता.मात्र पुढील एक वर्ष बरेली संस्थान हे इग्रजांच्या हातात सापडले नाही. 7 मे 1858 रोजी पुन्हा एकदा इंग्रजांनी बरेलीमध्ये आपली सत्ता स्थापन केली. 7 मे 1858 रोजी इंग्रजांनी बरेलीवर हल्ला केला. या युद्धात खान बहादुर खान यांना माघार घ्यावी लागली, मात्र त्यांनी हार मानली नाही. इंग्रजांविरोधात सैन्य जमा करण्यासाठी ते नेपाळला पोहोचले. मात्र तेथील राजा जंग बहादुर याने खान बहादुर खान यांची मदत न करता त्यांना अटक केली आणि त्यांना इग्रजांच्या स्वाधीन केले.

1860 मध्ये फाशी

खान बहादुर खान यांना अटक केल्यानंतर इंग्रजांनी त्यांचा छळ केला. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यांना दोषी ठरवून 22 फेब्रुवारी 1860 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर 24 मार्च 1860 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. मात्र त्यापूर्वी त्यांनी देशातील जनतेला इंग्रजांविरोधात लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते, तसेच हे मला काय मारणार मी अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना मारले आहे हा माझा विजय असल्याचे देखील म्हटले होते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.