बंगालचे CM सुवेंदू अधिकारी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर!, जंतरमंतर येथेही होती घातपाताची योजना…

बंगाल पोलिसांनी एका मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश केला आहे. या दहशतवादी गटाचा प.बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना टार्गेट करण्याचा इरादा होता.तसेच त्यांनी दिल्लीच्या जंतरमंतर येथील निदर्शनातही घातपात करण्याची योजनाही आखली होती अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

बंगालचे CM सुवेंदू अधिकारी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर!, जंतरमंतर येथेही होती घातपाताची योजना...
Bengal's Suvendu Adhikari on Pakistani terrorists' hit list!
| Updated on: Aug 01, 2026 | 11:31 PM

पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्स STF ने एका मोठ्या दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. स्पेशल टास्क फोर्सने दावा केला असून या गँगचे थेट पाकिस्तानात बसलेल्या अतिरेक्यांशी संधान जोडलेले होते. विशेष म्हणजे या अतिरेकी मॉड्युलच्या निशाण्यावर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी देखील होते आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे देखील त्यांची गडबड करण्याची योजना होती अशी धक्कदायक माहिती उघड झाली आहे.

पश्चिम बंगाल STFचे आयजी गौरव शर्मा यांनी शनिवारी एक पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की या प्रकरणात हमीम मंडल ( रा.बर्दवान ) आणि अर्पिता सरकार ( रा. साहेबगंज, झारखंड यांना अटक झाली आहे.

या प्रकरणाची सुरुवात हावडा येथील एका ज्येष्ठ मंत्र्याला खंडणीची धमकी मिळाली आणि त्याच्या मुलाच्या अपहराचा कटाच्या बातमीने याची सुरुवात झाली. तपासा दरम्यान पोलिसांना झारखंडच्या साहिबगंज येथून सुरु असलेल्या एका संशयित सोशल मीडिया हँडलचा छडा लागला. जेव्हा याचा सखोल तपास केला तेव्हा बर्दवानमध्ये रहात असलेल्या हमीम मंडल याचे नाव पुढे आले.

हमीम याच्या डिजिटल फुटप्रिंट आणि व्हॉट्सएप-टेलिग्राम चॅटची तपासणी केली तेव्हा ‘राणा’, ‘आबिद जट’, ‘उझैर’ आणि ‘हाद’ नावाचा अनेक संशयित हँडलच्या सतत संपर्कात होता. हे सर्व हँडल पाकिस्तानातून चालवत जात असल्याचे उघडकीस आले.

जंतर-मंतर निदर्शनात घातपाताची योजना

पाकिस्तानात बसलेले हँडलर हमीम मंडळ याला मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या येण्या जाण्याचे मार्ग, त्यांचा ताफा आणि सुरक्षेतील चुक याची रेकी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच आरोपींना जंतर – मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनात घुसून घातपाताची जबाबदारी वाटली गेली होती. हमीम याला पोलिसांची वर्दीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे तो सहज गर्दीत घुसुन वातावरण बिघडवू शकेल असे म्हटले जात आहे. एसटीएफने ३०-३१ च्या रात्री दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर बर्दवान कोर्टात हजर केले. पोलिस आता त्यांच्या नेटवर्कमध्ये आणखीन कोण होते. आणि त्यांना कोणी शस्रास्रे आणि आर्थिक मदत केली होती का याची चौकशी होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us