दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना, हुमायूच्या मकबऱ्याजवळ मोठी भिंत कोसळली, 5 जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

दिल्लीतील हजरत निजामुद्दीनमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे, पत्ते शाह दर्गा परिसरात एका खोलीचं छत कोसळून मोठा अपघात झाला, या दुर्घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना, हुमायूच्या मकबऱ्याजवळ मोठी भिंत कोसळली, 5 जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 15, 2025 | 7:36 PM

दिल्लीतील हजरत निजामुद्दीनमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे, पत्ते शाह दर्गा परिसरात एका खोलीचं छत कोसळून मोठा अपघात झाला, या दुर्घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 15 ते 16 जण ढिगाऱ्याखाली दबल्याचं वृत्त आहे. घटनास्थळी तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. घटनास्थळी आरडा-ओरड सुरू असून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यातील पाच जणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पत्ते शाह दर्गा हा हजरत निजामुद्दीनमध्ये मुघल बादशाह हुमायूच्या मकबऱ्या जवळ आहे.

शुक्रवारी येथे मोठी दुर्घटना घडली आहे, या दर्गाच्या परिसरात असलेल्या एका खोलीची भिंत अचानक कोसळली, त्यावेळी इथे काही नागरिक उपस्थित होते. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 ते 20 जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, फायर ब्रिगेड आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे, आतापर्यंत दहा जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे, दगड आणि विटांच्या ढिगाऱ्याला हटवण्याचं काम सुरू आहे.

 

पत्ते शाह दर्गा हा दिल्लीच्या प्रसिद्ध हजरत निजामुद्दीन दर्गाच्या परिसरात आहे. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे ही भिंती कोसळल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत दहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही भितं पावसामुळे कोसळल्याचा अंदाज आहे, मात्र अजून नेमकं कारण समोर आलेलं नाहीये, भिंत कशामुळे कोसळली याचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.