AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपकेंचा काँग्रेसला मोठा झटका, राहुल गांधींनी खास व्यक्तीकडून निरोप पाठवला, सर्व बडे नेते उपस्थित पण सीजेपी….

एकीकडे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे सीजेपीकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

अभिजीत दिपकेंचा काँग्रेसला मोठा झटका, राहुल गांधींनी खास व्यक्तीकडून निरोप पाठवला, सर्व बडे नेते उपस्थित पण सीजेपी....
Abhijeet Deepke Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 8:29 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधी पक्षांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसच्या वतीने अनेकदा आंदोलन देखील करण्यात आलं. दरम्यान दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. परंतु या आंदोलनाला आतापर्यंत काँग्रेसने कधीही पाठिंबा दिला नव्हता. तर दुसरीकडे काँग्रेसच्या आंदोलनात देखील सीजेपीचे नेते सहभागी झाले नाहीत. मात्र आता राहुल गांधींकडून सीजेपीसोबत संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीचे नेते, तसेच विद्यार्थी नेत्यांसाठी चहा पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी काँग्रेसकडून सीजेपीला देखील आमंत्रण देण्यात आलं होतं.

राहुल गांधी यांच्या या चहा पार्टीला सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पार्टीचे खासदार अवधेश प्रसाद, इकरा हसन, जेएमएमच्या खासदार महुआ माझी, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे, तणमूलच्या सागरिका घोष यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. परंतु आमंत्रण देऊन देखील सीजेपीचा एकही नेता या ठिकाणी फिरकला देखील नाही.

एका वृत्त वाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार सीजेपीसोबत सपंर्क साधण्यासाठी काँग्रेसकडून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना मध्यस्थ बनवण्यात आले होते. त्यांनी सीजेपीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी अभिजीत दिपके हे महाराष्ट्रात होते. तर सीजेपीचे इतर प्रमुख नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. काँग्रेस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीजेपीसोबत संपर्क तर झाला, मात्र या कार्यक्रमाला येण्यासाठी सीजेपीकडून फारसा उत्साह दाखवण्यात आलेला नाही. दरम्यान एकीकडे आता काँग्रेसकडून सीजेपीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या काळात आता सीजेपी काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  दरम्यान उद्या पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक