AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज संकटात पाकिस्तानच्या हाती लागलं मोठं घबाड, आता कच्चं तेल आणि गॅसची चिंता कायमचीच मिटली

सध्या स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र याचदरम्यान आता पाकिस्तानच्या हाती मोठं घबाड लागल्याचं पहायला मिळत आहे.

होर्मुज संकटात पाकिस्तानच्या हाती लागलं मोठं घबाड, आता कच्चं तेल आणि गॅसची चिंता कायमचीच मिटली
Shahbaz SharifImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 9:18 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जाहाजांसाठी बंद आहे. यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मध्य पूर्वेतून येणारं कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा साठा ठप्प झाला आहे. याचा मोठा फटका हा भारत, पाकिस्तानसारख्या कच्च्या तेलासाठी आणि एलपीजी गॅससाठी इतर देशांवर अवलंबून असलेल्या देशांना बसत आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पाकिस्तानच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. होर्मुजची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे सध्या पाकिस्तानवर मोठं संकट आहे, पाकिस्तानमध्ये कच्चं तेल आणि गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र आता पाकिस्तानमध्ये एक मोठा कच्च्या तेलाचा साठा सापडला आहे. सोबतच इथेच गॅसचा देखील साठा आहे.

हा कच्च्या तेलाचा साठा पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील सांघर जिल्ह्यात सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या तेल साठ्यामधून पाकिस्तानने दररोज दोन हजार बॅरल तेलाचं उत्पादन देखील सुरू केलं आहे. इथे फक्त तेलच आढळून आलेलं नाहीये, तर गॅसचा देखील मोठा साठा सापडला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची ती देखील चिंता मिटली आहे.Bobi Deep-1 असं या क्षेत्राचं नामकरण पाकिस्तानकडून करण्यात आलं आहे. पाकिस्तानी तेल आणि गॅस कंपनी OGDCL ने हा साठा शोधून काढला आहे. पाकिस्तानचा हा वाळवंटी प्रदेश राजस्थानला लागूनच आहे. भारत देखील राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचं उत्पादन घेतो.

याबाबत बोलताना पाकिस्तानची तेल आणि गॅस कंपनी OGDCL म्हटलं आहे की, इथे मोठा तेलाचा साठा आढळून आला आहे. यामुळे सध्या स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे पाकिस्तानवर जे ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, ते काहीअंशी दूर होण्यास मदत मिळणार आहे. पाकिस्तानला ऊर्जा क्षेत्रात या तेल साठ्यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.

Follow Us
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य