तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ; काँग्रेसची सर्वात मोठी घोषणा, बनवली नवी आघाडी

तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिल्याचं पहायला मिळालं. डीएमके, आणि एडिएमके सारख्या पक्षांना पराभवाची धूळ चारत थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. आता मोठी बातमी समोर आली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ; काँग्रेसची सर्वात मोठी घोषणा, बनवली नवी आघाडी
thalapathy vijay
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 8:26 PM

तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिल्याचं पहायला मिळालं. डीएमके, आणि एडिएमके सारख्या पक्षांना पराभवाची धूळ चारत थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीकेला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, या निवडणुकीमध्ये टीव्हीकेचे 107 आमदार निवडून आले, मात्र तरी देखील थलपती विजय यांचा पक्ष बहुमताच्या आकड्यापासून दूरच होता. शेवटी काँग्रेस आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर टीव्हीकेनं मतांचं गणित जुळवलं आणि तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं.

मात्र आता तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसने मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वात एका नव्या आघाडीची घोषणा केली आहे. सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्ट्री अलायन्स असं या आघाडीला नाव देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे आगामी काळात तामिळनाडूमधील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. बुधवारी काँग्रेसच्या वतीने या आघाडीची घोषणा करण्यात आली. चेन्नई स्थित टीव्हीकेच्या मुख्यालयात या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर टीव्हीकेच्या मुख्यालयात या नव्या आघाडीची बैठक देखील पार पडली आहे.

या आघाडीबाबत बोलताना काँग्रेसचे नेते मणिकम टागोर यांनी माहिती दिली की, आम्ही टीव्हीकेच्या नेतृत्वात नव्या आघाडीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री थलपती विजय हे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये या आघाडीचं नेतृत्व करतील असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे विजय यांना पाठिंबा देणारे सर्व पक्ष या बैठकीत सहभागी झालेले असताना सीपीएम आणि सीपीआय या बैठकीत सहभागी झाले नाहीत. दरम्यान आता या नव्या आघाडीची वाटचाल नेमकी कशी असणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रीय स्थरावर राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत, असंही यावेळी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या नव्या आघाडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us