अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पुण्यातून काढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची महासभा भाजपच्या मागणीनुसार पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आली. भाजपने या घटनेला निषेधार्ह म्हटले असून, पंतप्रधान हे देशाचे प्रथम नागरिक असल्याचे मत मांडले.
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पुण्यातून काढल्याच्या घटनेचे पडसाद कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजपने या कृतीचा तीव्र निषेध करत महासभेचे कामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्याची मागणी केली. भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी ही मागणी लावून धरली. शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक दर्जाचे नेते असून देशाचे लाडके पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे, जातीचे किंवा धर्माचे नसून देशाचे प्रथम नागरिक असतात. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत पंतप्रधानांचा फोटो काढणे हे निषेधार्ह आहे. या मागणीला शिंदे गट आणि इतर नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानंतर महासभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. भाजपने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पुढील भूमिका ठरवण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने मात्र या तहकुबीला विरोध केल्याचे म्हटले आहे.
Published on: Sep 09, 2026 08:20 PM
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....

