Raid At Engineer Home : सरकारी इंजिनिअरच्या घरावर छापा पडताच पत्नीने घराच्या पाठिमागे फेकली नोटांनी भरलेली बॅग

Raid At Engineer Home : SVU च्या प्राथमिक चौकशीनुसार विजय कुमार यांच्याकडे त्यांच्या कमाईपेक्षा 139.87 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान पाटण्याच्या साई शरणम निवासस्थानी जवळपास 31 लाख आणि 42 हजार रुपयाची कॅश मिळाली.

Raid At Engineer Home : सरकारी इंजिनिअरच्या घरावर छापा पडताच पत्नीने घराच्या पाठिमागे फेकली नोटांनी भरलेली बॅग
Raid At Engineer Home
| Updated on: Nov 05, 2026 | 12:38 PM

बिहारमध्ये एका सरकारी इंजिनिअरच्या घरावर विशेष दक्षता युनिटने छापा मारला. त्यावेळी जे घडलं, त्याने अधिकारी सुद्धा हैराण झाले. विशेष दक्षता युनिट पाटण्यामध्ये सुपरिंटेंडिंग इंजीनियर विजय कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचलं. त्यावेळी त्यांच्या पत्नीने आधी दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्याचवेळी घराच्या पाठिमागे नोटांनी भरलेली एक बॅग फेकली. SVU युनिटची त्यावर नजर जातच ती बॅग लगेच ताब्यात घेण्यात आली. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. विशेष दक्षता युनिटने पाटण्याशिवाय सहसरा आणि औरंगाबाद येथील त्यांच्या ठिकाणावरही छापे मारले. विजय कुमार यांच्यावर उत्पन्नापेक्षा जवळपास 3 कोटी 28 लाख 70 हजार 600 रुपये जास्त संपत्ती बाळगल्याचा आरोप आहे. 4 नोव्हेंबर 2026 चं हे प्रकरण आहे.

बिहारच्या विशेष दक्षता युनिटच्या वेगवेगळ्या टीम्सनी पथ निर्माण विभागात तैनात असलेल्या सुपरिंटेंडिंग इंजीनियर विजय कुमार यांच्या ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली. पाटण्याच्या दानापुर गोला रोड आणि महेश नगर येथे असलेल्या त्यांच्या घराची तपासणी केली. पाटणा येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नीने घराचा गेट उघडण्यास नकार दिला. त्याचवेळी घराच्या पाठिमागे नोटांनी भरलेली बॅग फेकल्याचा आरोप आहे.

Loading...

आधी चौकशी केली, मग छापेमारी

SVU च्या प्राथमिक चौकशीनुसार विजय कुमार यांच्याकडे त्यांच्या कमाईपेक्षा 139.87 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप आहे. प्राथमिक अंदाजानुसार या संपत्तीची किंमत 3 कोटी 28 लाख 70 हजार 600 रुपये आहे. तपास यंत्रणेला माहिती मिळालेली की, विजय कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर पाटण्याच्या दानापूरसह दुसऱ्याभागात अनेक फ्लॅट, जमिनीचे तुकडे आणि मोठे फ्लॅट आहेत. म्हणून आधी चौकशी केली. मग छापेमारी केली.

बँक खात्यात जवळपास 1 कोटी 29 लाख 46 हजार रुपये

तपासादरम्यान पाटण्याच्या साई शरणम निवासस्थानी जवळपास 31 लाख आणि 42 हजार रुपयाची कॅश मिळाली. त्याशिवाय वेगवेगळ्या बँकांमध्ये 10 लाख रुपयाच्या एफडीची माहिती मिळाली. तपासात 23 लाख 23 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि गुंतवणूकीशी संबंधित कागदपत्रं मिळाली आहेत. विजय कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जवळपास 1 कोटी 29 लाख 46 हजार रुपये जमा आहेत. एजन्सी ही संपत्ती आणि पैशांच्या स्त्रोताचा शोध घेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us