भाजपला मोठा धक्का! तब्बल 8 वर्ष पक्षाला साथ देणारा नेता नाराज, तडकाफडकी दिला राजीनामा
भाजपला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. पक्षाला तब्बल 8 वर्ष साथ देणारा नेता नाराज होत तडकाफडकी राजीनामा दिला आहे. माजी आमदाराच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंडमधील माजी आमदाराने पक्षाची सोडली आहे. तब्बल 8 वर्ष पक्षाचा आदेश मानण्याऱ्या यशपाल बेनाम यांनी अखेर मोठा निर्णय घेतला. यशपाल बेनाम यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बेनाम यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले. बेनाम यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता राजीनाम्यानंतर बेनाम काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
यशपाल बेनाम यांनी एका पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली. बेनाम यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी राजीनामा देताना कोणतंही कारण दिलेलं नाही. त्यांनी पत्रात वैयक्तिक कारण नमूद केलं आहे. बेनाम यांनी घेतलेल्या निर्णयाची राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया देखील उलटू लागल्या आहेत. बेनाम हे पौड नगरपालिकेचे तीन वेळा नगराध्यक्ष राहिले आहेत. 2007 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत तत्कालीन शिक्षण मंत्री नरेंद्र सिंह भंडारी आणि भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत यांचा पराभव केला होता. पुढे बेनाम हे 2018 साली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बेनाम यांनी विजय मिळवला होता.
राजीनाम्यानंतर कोणत्या पक्षात जाणार?
बेनाम यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, भाजपमध्ये राहून सलग 8 वर्ष आदेशाचं पालन केलं. परंतु आता पक्षात योग्य मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपपासून वेगळे होत असल्याचा निर्णय घेतला. आता लवकरच मोठी राजकीय घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यशपाल बेनाम पुढे म्हणाले की, ‘8 वर्षांआधी 18 ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आठ वर्षांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपनंतर बेनाम हे काँग्रेमध्ये जाणार की आणखी दुसऱ्या पक्षात जाणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
