AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला घवघवीत यश! 5 पैकी 3 राज्यांमध्ये कमळ फुलणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Exit Poll BJP Victory : एक्झिट पोल्सनुसार, भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळताना दिसत आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे.

भाजपला घवघवीत यश! 5 पैकी 3 राज्यांमध्ये कमळ फुलणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
BJP Victory Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 29, 2026 | 7:51 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या जवळपास 12 वर्षांपासून केंद्रात भाजपप्रणित सरकार आहे. अलिकडेच 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या मतदानानंतर आज एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात भाजपला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करताना पहायला मिळत आहे. यात पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीचा समावेश आहे. त्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार

समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये आसाममध्ये भाजप पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाममध्ये एकूण 126 जागांवर निवडणूक झाली होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने चांगलीच ताकद लावली होती. भाजपाचे केंद्रातील बडे नेते या राज्यात प्रचारासाठी गेले होते. आता एक्झिट पोलनुससार भाजपाला सत्ता मिळू शकते. अॅक्सिज माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये एनडीएला 88 ते 100 जागा मिळू शकताात. तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यात भाजपचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये भगवा फडकणार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आला आहे. चाणक्यच्या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 130 – 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर पोल डायरीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अवघ्या 99 ते 127 जागंवरच समाधान मानावं लागणार आहे. तर भाजपला 142 ते 171 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यात भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

पद्दुचेरीत पुन्हा भाजप सरकार

पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचेही एक्झिट पोल समोर आले आहेत. यानुसार भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एनडीए पुदुचेरीमध्ये 16 ते 20 जागा जिंकेल असा अंदाज आहे. डीएमके आणि काँग्रेस आघाडी 6 ते 8 जागा जिंकेल, तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट