माजी मुख्यमंत्री भाजपवर नाराज, साथ सोडणार? म्हणाले, ‘मला 60 वर्षांचा राजकीय अनुभव, पण…’

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. परंतु त्यांनी काँग्रेसची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. अमरिंदर सिंग यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

माजी मुख्यमंत्री भाजपवर नाराज, साथ सोडणार? म्हणाले, मला 60 वर्षांचा राजकीय अनुभव, पण...
BJP
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 7:41 AM

पंजाबच्या राजकारणाचा 60 वर्षांचा अनुभव असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ‘मी राज्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. परंतु आता अशी वेळ आली आहे की, मला कोणी विचारेना झालं आहे, असं विधान माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केल्याने चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये परतणार का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी राजकीय अनुभव सांगितला, परंतु त्यांनी भाजप सोडण्याविषयी कोणतीही घोषणा केली नाही.

नवी दिल्लीत शुक्रवारी कॅप्टन अमरिदर सिंग यांनी पंजाबच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. भाजपला पंजाब नीट समजलं नाही का, ज्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्तेवर परतण्याची चर्चा सुरू झाली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमरिंदर सिंग म्हणाले, मी 60 वर्षांपासून पंजाबच्या राजकारणात आहे. मी एकटा नाही, माझे अनेक सहकारी आहेत. सर्वांनी राज्यातील घडामोडी जवळून पाहिल्या आहेत. परंतु आता अशी वेळ आली आहे की, आता कोणी सल्ला देखील घेत नाही’.

राहुल गांधी यांच्याकडून अमरिंदर सिंग यांचं कौतुक 

‘मी पंजाबचा रहिवासी आहे. राज्याविषयी भाष्य करणे माझी जबाबदारी आहे. मी विचार मांडून पक्ष सोडण्याचे संकेत देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपवरील नाराजीवर व्यक्त करताना त्यांनी राजकीय कारकि‍र्दीचं उदाहरण दिलं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं की, ‘ऑपरेशन ब्लू स्टारनंतर काँग्रेस सोडून अकाली दलात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परतलो. पक्ष बदलत असतात. आता याचा अर्थ मी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. मी फक्त पंजाबविषयी विचार मांडत आहे’. तत्पूर्वी, राहुल गांधी यांना 7 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एक प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा भाजपमधील नेता कोण? त्यावेळी त्यांनी कॅप्टन अमरिंद सिंग यांचं नाव घेतलं होतं. राहुल गांधी यांनी अमरिंदर सिंग यांच्यासोबत काम केल्याचा उल्लेख केला. तसेच अमरिंदर हे ‘कूल’ असल्याचे सांगितले होते. अमरिंदर सिंग यांनी दुसऱ्यांदाही बोलताना भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us