मोठी बातमी! काँग्रेसची ताकद आणखी वाढणार? माजी मुख्यमंत्र्यांची घरवापसी होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

काँग्रेसची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात माजी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

मोठी बातमी! काँग्रेसची ताकद आणखी वाढणार? माजी मुख्यमंत्र्यांची घरवापसी होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 8:18 AM

काँग्रेस सोडल्यानंतर पाच वर्षानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे सोमवारी दिल्लीत सोनिया गांधी यांचं ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सहभागी झाले. ते कार्यक्रमाच्या पहिल्या रांगेत बसल्याचे दिसून आले. सध्या कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपमध्ये आहेत. 5 वर्षांपूर्वी सात पानी चिठ्ठी लिहून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी सोनिया गांधी आणि त्यांच्या मुलांवर अर्ध्या रात्री त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्रि‍पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी 84 वर्षीय अमरिंदर सिंग यांना पाहिलं. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी कुटुंबाशी संबंधित एक किस्सा सांगितला. कार्यक्रमानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अनेक सवाल विचारले गेले. त्यांना पंजाबच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले.  राहुल गांधी या कार्यक्रमात आई-वडिलांविषयी सांगितले. तसेच गांधींनी त्यांच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा केला. त्यांनी 1980 सालचा एक किस्सा सांगितला. राहुल गांधी म्हणाले, ‘ मी या कार्यक्रमाला अमरिंदर सिंग यांना पाहत आहे. आम्ही त्यांना राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी भांडताना पाहिलं आहे. फक्त एकदाच त्यांच्याशी भांडताना पाहिलं आहे. माझे वडील हे अमरिंदर सिंग यांच्याशी बोलत होते. मी भांडताना एकदाच पाहिलं होतं. मी कोणत्याही घरात असं कधी पाहिलं नाही. माझे आई-वडील कधीकधी वाद घालायचे.  त्यापैकी एकदाच कडाक्याच भांडण झालं होतं’.

Loading...

पटियालाच्या राजघराण्याशी संबंधित असलेले अमरिंदर यांचे संबंध हे राजीव गांधी यांच्या काळापासून आहे. राजीव गांधी हे त्यांचे शाळेपासून मित्र होते. माझे वडिलांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भाजपमधील आवडता नेते म्हणून अमरिंदर सिंग यांच्या नावाचा उल्लेख केला होता. राहुल गांधी यांच्या विधानावर अमरिंदर सिंग म्हणाले, मला आता व्यवस्थित आठवत नाही की, राहुल गांधी हे कोणत्या काळाविषयी बोलत आहेत. परंतु राजीव गांधी यांच्याशी अनेकदा बोलणं व्हायचं.

अमरिंदर सिंग यांना काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर म्हणाले, ‘मी या कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखतो. आमचं कौटुंबिक नाते आहे. मी आता त्यांच्या पक्षात प्रवेश करावे, असं कोणी विचारले नाही. माझं गांधी कुटुंबाशी सामाजिक विषयावर चर्चा झाली. मी स्वत:चं पुस्तक लाँच केलं.  त्यावेळी सोनिया गांधी स्वत: पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या तीन कार्यक्रमांना हजेरी लावली होती. वेगवेगळ्या देशातही राजकीय विचारधारा बाजूला ठेवून नेतेमंडळी सामाजिक कार्यक्रमात भेट राहतात’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us