AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US conflict : ट्रम्प झुकले; स्ट्रीट ऑफ होर्मूज पुन्हा होणार सुरू, भल्या -भल्यांना नाही जमलं ते या छोट्या देशानं करून दाखवलं

गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद आहे, त्यामुळे जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र आता मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत असून, पुन्हा एकदा लवकरच स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू होण्याची शक्यता आहे.

Iran-US conflict : ट्रम्प झुकले; स्ट्रीट ऑफ होर्मूज पुन्हा होणार सुरू, भल्या -भल्यांना नाही जमलं ते या छोट्या देशानं करून दाखवलं
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 4:24 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 39 दिवस युद्ध सुरू होतं, त्यानंतर अखेर अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूज बंदच आहे. युद्धविरामाची घोषणा करतानाच इराणने तातडीने स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू करावं अशी अट अमेरिकेनं घातली होती. तर दुसरीकडे इस्त्रायलने आधी लेबनॉनवरील हल्ले बंद करावते असं इराणने म्हटलं होतं. मात्र युद्धविरामानंतर देखील इस्त्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरूच होते, त्यामुळे इराणने देखील स्ट्रीट ऑफ होर्मूज जहाजाच्या वाहतुकीसाठी खुला केला नाही. तर दुसरीकडे आता अमेरिकेनं देखील हा मार्ग ब्लॉक केला आहे. डबल ब्लॉकमुळे संपूर्ण जगावरच मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे.

मात्र असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गुरुवारी लेबनॉन आणि इस्त्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली. हा युद्धविराम असाच झाला नाही तर त्यासाठी सौदी अरेबियाचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी पुढाकार घेतल्याचं आता समोर आलं आहे. एका रिपोर्टनुसार त्यांनी आधी अमेरिकेचे राष्ट्रापती डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लेबनॉन आणि इस्त्रायलमध्ये यु्द्धविराम घडवून आणा, त्यानंतर त्यांनी युद्धविरामासाठी इस्त्रायलवर देखील दबाव निर्माण केला आणि शेवटी हा युद्धविराम घडून आला.

दरम्यान स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे त्याचा फटका हा सौदी अरेबियाला देखील बसत आहे. इराणने अशी अट घातली होती की जोपर्यंत लेबनॉनवरील हल्ले बंद होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा वाहतुकीसाठी स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू करणार नाहीत, परंतु आता सौदीच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम घडवून आला आहे. त्यामुळे आता इराणला देखील होर्मूजची सामुद्रधुनी पुन्हा एकदा ओपन करावीच लागणार आहे, अता इराणच्या भूमिकेकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. सध्या या मार्गाने दिवसभरात केवळ 15 चं जहाजांना जाण्याची परवानगी इराणकडून देण्यात आली आहे,  मात्र आता सौदीच्या मध्यस्थीमुळे मोठं संकट टळण्याची शक्यता आहे. इराण पुन्हा एकदा हा मार्ग वाहतुकीसाठी ओपन करू शकतो, कारण आता लेबनॉनवरील हल्ले बंद झाले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...