LIVE: पंतप्रधान मोदींचा 69 वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा पाऊस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस (Narendra Modi Birthday) आहे. त्यानिमित्ताने देशभरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे.

LIVE: पंतप्रधान मोदींचा 69 वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा पाऊस

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस (Narendra Modi Birthday) आहे. त्यानिमित्ताने देशभरात कार्यकर्त्यांकडून शुभच्छांचा पाऊस पडत आहे.  कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करत अनेक कार्यक्रमाचंही आयोजन करत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी मोदी वेगवगळ्या ठिकाणी भेट देणार आहेत. सकाळी 8 वाजता ते नर्मदेची पूजा करणार आहेत.

LIVE Updates

Picture

विकासासोबत पर्यावरणाचं रक्षण करता येतं : नरेंद्र मोदी

17/09/2019,1:35PM
Picture

नर्मदा जिल्ह्यातील गरुडेश्वर दत्त मंदिरात पूजा करताना पंतप्रधान मोदी

17/09/2019,12:02PM
Picture

पंतप्रधान मोदी सरदार सरोवर धरणावर पूजा करताना

17/09/2019,11:07AM
Picture

स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील एकता नर्सरीला मोदींची भेट

17/09/2019,11:03AM
Picture

पंतप्रधान मोदी केवाडिया येथील फुलपाखरु उद्यानात

17/09/2019,11:01AM
Picture

मोदींकडून केवाडिया येथील कॅक्टस उद्यानालाही भेट

17/09/2019,9:45AM
Picture

केवाडिया येथील जंगल सफारी पार्कला भेट देताना पंतप्रधान मोदी

17/09/2019,9:42AM
Picture

पंतप्रधान मोदींची केवडिया येथील खालवानी पर्यटन स्थळाला भेट

17/09/2019,8:49AM
Picture

पंतप्रधान मोदी नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे दाखल, थोड्याच वेळात सरदार सरोवर धरणाला भेट देणार

17/09/2019,8:34AM


पंतप्रधान मोदी आई हिराबेन यांचीही भेट घेणार आहेत. मात्र, त्याआधी ते नर्मदा नदीवरील केवडिया धरणावर जातील. सकाळी 10 वाजता मोदी गरुडेश्वर मंदिरालाही भेट देतील.

देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. ट्विटरवर पहिल्या 10 ट्रेंडपैकी 7 ट्रेंड केवळ मोदींच्या वाढदिवसाशी संबंधित आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील त्यांचे समर्थक वेगवेगळे हॅशटॅग वापरून शुभेच्छा देत आहेत.


सोमवारी रात्री मोदींचे अहमदाबादमध्ये देखील विशेष स्वागत झाले. पंतप्रधान मोदी रात्री उशिरा अमहदाबाद विमानतळावर दाखल झाल्यानंतर उपस्थितांनी घोषणा देत मोदींच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. समर्थकांच्या शुभेच्छांचा स्विकार करत मोदींनीही त्यांना प्रतिसाद दिला.


दिल्ली भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पंतप्रधान मोदींचा वाढदिवस मध्यरात्रीच्यावेळी इंडिया गेट येथे साजरा केला. भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी 69 फूट उंचीचा केक कापून मोदींचा वाढदिवस साजरा केला.

मोदींच्या भेटींची दिवसभरातील रुपरेषा

पंतप्रधान मोदी आज सरदार सरोवर धरणालाही भेट देणार आहेत. धरणातील पाण्याची पातळी 138.68 मीटर झाली आहे. 2 वर्षांआधी पूर्ण झालेले हे धरण पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये नर्मदा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जवळजवळ 5000 ठिकाणांवर नर्मदेची आरती करण्यात येणार आहे. मोदी 10 वाजता गरूडेश्वरदत्त मंदिरात पूजा करतील. त्यानंतर ते एका सभेला संबोधित करतील.

गुजरात सरकारने मोदींच्या वाढदिवसानिमित्त केवाडिया येथे ‘नमामि देवी नर्मदा महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. केवाडिया धरणावर महाआरती देखील घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. सायंकाळी सूरतमधील भाजप आमदार हर्ष सांघवी यांनी एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. यात ‘सिंगल यूज प्लास्टिक थीम’वर आधारीत प्रदर्शन पाहायला मिळेल. तसेच मोदींच्या जीवनावर आधारित गोष्टीचंही प्रदर्शन होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *