AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhattisgarh Video | गांजाने गच्च भरलेली कार, तब्बल 20 जणांचा चिरडलं, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

दसरा महोत्सवात सामील झालेल्या तब्बल 20 लोकांना एका कारने चिरडल्याची धक्कादायक घटना छत्तीसगड येथे घडली आहे. पत्थळगावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या कारने लोकाना चिरडलं आहेस त्या कारमध्ये गांजा भरलेला होता, असं सांगण्यात येत आहे.

Chhattisgarh Video | गांजाने गच्च भरलेली कार, तब्बल 20 जणांचा चिरडलं, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
CHHATTISGARH
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 5:48 PM
Share

रायपूर : दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या  सोहळ्यात सामील झालेल्या तब्बल 20 लोकांना एका कारने चिरडल्याची धक्कादायक घटना छत्तीसगड येथे घडली आहे. पत्थळगावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या कारने लोकाना चिरडलं आहे त्यामध्ये गांजा भरलेला होता. चिरडलेल्या वीस लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर बकीच्या जखमी लोकांना पत्थळगावातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळला

मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारने लोकांना चिरडलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा ठेवण्यात आलेला होता. ही दुर्घटना घडल्यानंतर दसऱ्यानिमित्त जमा झालेल्या लोकांनी कारचा पाठलाग केला. तसेच आरोपींना पकडून त्यांना किरकोळ मारहाण केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या या आरोपींना अटक करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ :

जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दसऱ्यासारख्या पवित्र सणाच्या दिवशी अशी दुर्घटना घडल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

इतर बातम्या :

एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार, घटनेनंतर आरोपी फरार

धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या

हलगर्जीपणाचा कळस ! टॉयलेटमध्ये बाळांतीण केली, नंतर अर्भकाचं डोकं कमोडमध्ये अडकलं

(chhattisgarh speedy car crashes 20 people who gathered for dussehra festival)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.