भारतही तयारीत आहे…. पाकला ‘या’ दोन देशांची मोठी मदत, पर्दाफाश करत CDS जनरल यांचा थेट इशारा

चीन आणि आणखी एका देशाच्या मदतीने पाकिस्तानची अंतराळ क्षेत्रातील ताकद वाढत असल्याचा इशारा भारताच्या CDS यांनी दिला आहे. पाकिस्तानच्या या वाढत्या क्षमतेला रोखण्यासाठी भारतालाही आता वेगळा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

भारतही तयारीत आहे.... पाकला या दोन देशांची मोठी मदत, पर्दाफाश करत CDS जनरल यांचा थेट इशारा
Cds General Ns Raja Subramani
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 11:49 PM

पाकिस्तानला चीनकडून मिळणाऱ्या मदतीमुळे त्याची अंतराळ क्षेत्रातील क्षमता वाढत आहे. आता या सहकार्यात तुर्कीचाही समावेश असण्याची शक्यता आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल एन. एस. राज सुब्रमण्यम यांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे. पाकिस्तानला चीनकडून मिळणाऱ्या अंतराळ तंत्रज्ञानाचा आणि गुप्त माहिती गोळा करण्याच्या क्षमतेचा भारताला आपल्या संरक्षण रणनीतीत विचार करावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चीनसोबत तुर्कीचीही मदत?

नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जनरल राज सुब्रमण्यम बोलत होते. यावेळी पाकिस्तानच्या अंतराळ क्षेत्रातील वाढत्या क्षमतेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाकिस्तानला चीनची मदत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानची अंतराळ संस्था SUPARCO स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी काम करत आहे. याशिवाय तुर्कीकडूनही पाकिस्तानला मदत मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Loading...

चीनचं तंत्रज्ञान ठरणार निर्णायक

चीनकडे असलेली गुप्त माहिती गोळा करणे, टेहळणी करणे आणि लक्ष्याची अचूक माहिती मिळवण्याची क्षमता पाकिस्तानलाही उपलब्ध होऊ शकते, असं जनरल सुब्रमण्यम यांनी नमूद केलं. यामध्ये ISR म्हणजेच इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रिकॉनिसन्स या यंत्रणेचा समावेश आहे. याशिवाय पोझिशनिंग, नेव्हिगेशन आणि टाइमिंगशी संबंधित तंत्रज्ञानाचाही पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. त्यामुळे भारताला या बदलत्या समीकरणांचा विचार करून आपल्या संरक्षण क्षमतांमध्ये वाढ करावी लागेल.

भारताचं पुढचं पाऊल काय?

पाकिस्तानच्या वाढत्या क्षमतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही अंतराळ क्षेत्रातील संरक्षण यंत्रणा अधिक भक्कम करत आहे. भारताचा स्पेस बेस्ड सर्व्हिलन्स (SBS-3) कार्यक्रम कार्यान्वित झाल्यानंतर देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होईल, असं जनरल सुब्रमण्यम यांनी सांगितलं. याशिवाय अधिक उपग्रह तयार करणे आणि ते अवकाशात पाठवण्याच्या प्रक्रियेत खासगी कंपन्यांचाही सहभाग वाढवला जात आहे.

दरम्यान, चीनने नुकतेच शेनझोऊ-24 हे अंतराळयान प्रक्षेपित केले. या मोहिमेत पाकिस्तानी नागरिक मुहम्मद झीशान अली यांचाही समावेश होता. चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेत सहभागी होणारे ते पहिले परदेशी नागरिक ठरले. चीन-पाकिस्तानमधील वाढत्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण यंत्रणेसाठी या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us