अभिजीत दिपके यांनी मानले थेट नरेंद्र मोदी यांचे आभार, पहिल्यांदाच..

अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मागील काही दिवसात भाष्य केले नव्हते. आता पुन्हा त्यांनी आपला मोर्चा उघडला आहे. यासोबतच अभिजीत दिपके यांनी थेट नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

अभिजीत दिपके यांनी मानले थेट नरेंद्र मोदी यांचे आभार, पहिल्यांदाच..
Abhijit Dipke and Narendra Modi
| Updated on: Nov 27, 2026 | 8:42 AM

नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीने रॅलीचे आयोजन केले. या रॅलीला परवानगी मिळणार की नाही, यावरून जोरदार चर्चा रंगत असतानाच पोलिसांनी या रॅलीसाठी परवानगी दिली. यादरम्यानच अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. इतिहासात आमचे नाव लिहिल्याने धन्यवाद असे अभिजीत दिपके यांनी म्हटले. सीजेपी काही दिवस शांत होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात लढा सुरू केला. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, साैरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यावर कारवाई करत इतिहास रचला. अभिजीत दिपके यांनी पुन्हा विमानातून आपल्याला ताब्यात घेतल्यावर भाष्य केले. मी आशु आणि साैरभ या देशातील इतिहासातील असे व्यक्ती आहोत, ज्यांना सरळ विमानातून अटक केली.

थॅक्य यू मोदीजी इतिहासात आमच्या नावाचा उल्लेख होणार, त्याबाबत. कारण कोणाला तरी आठवते का? कोणाला विमानातून उचलण्यात आल्याचे. इतकी भीती की, विमानातून उललले की पुढे काय होणार. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सीजेपी पुकारले.

Loading...

या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली, पण तरीही सीजेपीने सर्वांना दिल्लीकडे येण्याचे आवाहन केले. अभिजीत दिपके यांच्यासह प्रमुख नेते विमानाने मुंबईहून दिल्लीकडे निघाले. पण पोलिसांनी दिल्ली विमानतळावर हे विमान पोहोचताच तिघांनाही ताब्यात घेतले. ज्यामुळे हे आंदोलन मोडून काढण्यात यश आले. अभिजीत दिपके, दास आणि रांका यांना नोटीस देण्यात आल्या.

हेच नाही तर त्यांच्याकडून काही बॉन्डवर सह्या देखील घेण्यात आल्या. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सीजेपीने जंतर मंतरवर मोठे आंदोलन पुकारले. हेच नाही तर त्यांनी थेट संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्नही केला, ज्यानंतर एकच मोठा गोंधळ उडाला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी धरपकड झाली. देशभरातून तरूण या आंदोलनात सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातही जंतर मंतरवर तसाच लढा सीजेपीला उभारायचा होता. मात्र, त्यांना यश मिळाले नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us