CNG Price Hike : सीएनजीच्या किंमतीत पुन्हा 2 रुपयांची वाढ, दिल्लीत 73.61 पैसे प्रती किलो, मुंबईत किती रेट?

सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आलीय. त्यामुळे सीएनजीवरील वाहनधारकांच्या खिशावर याचा भार पडला आहे. देशात सर्वसामान्य महागाईने बेजार झाला असाताना आता खिशावरचा फार आणखी वाढला आहे.

CNG Price Hike : सीएनजीच्या किंमतीत पुन्हा 2 रुपयांची वाढ, दिल्लीत 73.61 पैसे प्रती किलो, मुंबईत किती रेट?
सीएनजीच्या दरात वाढ
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 7:28 AM

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Hike) आधीच गगनाला भिडल्या असताना आता आणखी एक खिशावर भार टाकणारी बातमी आली आहे. कारण देशात सीएनजीच्या किंमतीत (CNG Price Hike) पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आलीय. मुंबईत आजचे सीएनजीचे दर हे  76.00 रुपयांवर होते, ते आता आणखी दोन रुपयांनी वाढणार आहेत. त्यामुळे सीएनजीवरील वाहनधारकांच्या खिशावर याचा भार पडला आहे. देशात सर्वसामान्य महागाईने (Inflation) बेजार झाला असाताना आता खिशावरचा फार आणखी वाढला आहे.  पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये गेल्या 37 दिवसांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर मुंबई पेट्रोलचा दर 120 रुपये लीटर आहे. तसेच डिझेलचा दर 105 रुपयांनी विकलं जातंय. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या दरम्यान असून डिझेलचही शंभरीच्या पार जाऊन बरेच दिवस झाले आहे. त्यात आता सीएनजी आणख दोन रुपयांनी वाढल्याने आता चिंता वाढली आहे.

गॅसच्या दरातही मोठी वाढ

घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती या महिन्यात वाढल्या आहेत. 50 रुपयांच्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत आता 999.5 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही या सिलिंडरची किंमत 999.5 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1026 रुपये आहे आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत 1015.50 रुपये झाली आहे.

नोएडामध्ये त्याची किंमत 997.5 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी 10 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. मोठ्या शहरांमध्ये त्याच्या किंमतीत 104 रुपयांपर्यंत वाढ नोंदवली गेली. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर महाग झाला होता. 22 मार्च रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली होती.

कच्च्या तेलाच्या किंमतींनी डोकेदुखी वाढवली

कच्च्या तेलाच्या सध्याच्या किमती केवळ भारतासाठीच नाही तर जगातील सर्व देशांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. कच्च्या तेलाचा वापर केवळ पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठीच नाही तर दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या 2 हजारांहून अधिक वस्तूंच्या निर्मितीमध्ये कच्चा माल म्हणून केला जातो.

अशा परिस्थितीत कच्चे तेल जितके महाग होईल तितक्या त्यापासून बनवलेल्या वस्तूंच्या किमतीही वाढतील. त्यामुळे सध्या पट्रोल डिझेलचे भावही गगनाला भिडले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्येही पेट्रोल डिझेलच्यााकिंमतींवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र सर्वसामन्यांपुढील प्रश्न तसाचा आहे.