Abhijeet Dipke: दसऱ्याला जाळला कॉकरोचचा पुतळा, शाहरूख खानची आठवण काढत अभिजीत दिपके यांची ती पोस्ट व्हायरल

Abhijeet Dipke Recall Shahrukh Khan: देशभरात दसरा उत्सवात साजरा झाला. त्याचवेळी राष्ट्रीय राजधानीत एक मोठी घटना घडली. कॉकरोच, झुरळाचा एक पुतळा रामलीला सोहळ्यात जाळण्यात आली. त्यावर अभिजीत दिपके यांनी अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

Abhijeet Dipke: दसऱ्याला जाळला कॉकरोचचा पुतळा, शाहरूख खानची आठवण काढत अभिजीत दिपके यांची ती पोस्ट व्हायरल
दसऱ्याला जाळला कॉकरोचचा पुतळा, शाहरूख खानची आठवण काढत अभिजीत दिपके यांची ती पोस्ट व्हायरल
| Updated on: Oct 21, 2026 | 8:46 AM

Abhijeet Dipke Recall Shahrukh Khan: देशभरात दसरा आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. दिल्लीच्या नेताजी सुभाष प्लेस येथील रामलीला सोहळ्यात रावणासोबतच 30 फुटांच्या एका झुरळाचा पुतळाही जाळण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीचा विरोध म्हणून हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. उपरोधीकपणे हा पुतळा जाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकारावर सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी अत्यंत खोचक आणि भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दिपकेंचे शाहरूख खानच्या गाण्याने प्रत्युत्तर

Loading...

दिल्लीत कॉकरोचचा पुतळा जाळण्यात आल्याचे कळताच अभिजीत दिपके यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली. सीजेपी संस्थापक दिपके यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. “फुकट प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद” असा पलटवार दिपके यांनी केला आहे. त्यानंतर त्याने शाहरूख खान याच्या प्रसिद्ध स्वदेश चित्रपटातील एक डायलॉग शेअर केला. त्याची जोरात चर्चा सुरू झाली आहे. “मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं…” दिपके यांच्या या उपरोधिक टोल्याची आता समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सत्ताधारी घाबरल्याचा सीजेपीचा दावा

या संपूर्ण प्रकरणात सीजेपीची कायदेशीर बाजू मांडणाऱ्या रत्ना सिंह यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सोशल मीडियावर याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. दसऱ्याच्या दिवशी कॉकरोचचा पुतळा जाळला म्हणजे सत्ताधारी किती घाबरले आहेत. ते किती भयभीत आहे हे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया रत्ना सिंह यांनी दिली. तुम्ही आम्हाला इतके महत्त्व देत आहात, याचा अर्थ आम्ही काहीतरी नक्कीच योग्य केले आहे. आमचा प्रभाव वाढला आहे, हे समोर आल्याचे त्या म्हणाल्या.

कॉकरोच हा घाणेरड्या वातावरणाचे प्रतिक

तर दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेस येथील रामलीला सोहळ्याच्या आयोजकांनी ही मोठा युक्तीवाद केला आहे. त्यांच्या मते कॉकरोच हा घाणेरड्या वातावरणाचे प्रतिक आहे. स्वच्छ भारत, स्वच्छ दिल्ली या अभियानाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि समाजातील वाईट प्रवृत्तींना नष्ट करण्याचा संदेश देण्यासाठी हा पुतळा जाळण्यात आला आहे. पण पुतळा दहनावरून सीजेपीविरुद्ध सत्ताधारी असे वातावरण तापले आहे. तर सोशल मीडियावर दोन्ही बाजूचे समर्थक भिडले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us