AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगामी निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल, बड्या नेत्याचा पदाचा राजीनामा, तडकाफडकी दिल्लीला रवाना

आगामी निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला आहे.

आगामी निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल, बड्या नेत्याचा पदाचा राजीनामा, तडकाफडकी दिल्लीला रवाना
congress news
| Updated on: Oct 01, 2026 | 7:53 AM
Share

काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काही महिन्याआधीच काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. अमरिंदर सिंग वडिंगा यांनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. पंजाब प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत विजय इंदर सिंगला यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधील फेरबदलाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा वडिंग यांना पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर वडिंग यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज गुरुवारी दिल्लीसाठी रवाना होतील. त्यांची दिल्लीत पुढील एक ते दोन दिवसांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट होण्याची शक्यता आहे. राजा वडिंग यांना 2022 साली पंजाबच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती. त्यांनी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानंतर काँग्रेसने राजीनामा देण्यास सांगितलं. त्यामुळे काँग्रेस आगामी निवडणुकीत नव्या चेहऱ्यासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत विजय इंदर सिंगला यांचे नाव आघाडीवर आहे. सिंगला यांना या पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. या व्यतिरिक्त चरणजीत सिंह चन्नी आणि सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. या व्यतिरिक्त अनेक नेते शर्यतीत आहे. या पदाबाबतचा अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने बाकी राहिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रदेशाध्यपदाचा नेता बदलणे, ही मोठी राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा काँग्रेसच्या घोषणेकडे लागले आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेसमधील चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. पंजाब काँग्रेसमधील फेरबदल महत्वाचे मानले जात आहे.  तर काही दिवसांपूर्वी भाजप नेते, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदाराचं कौतुक केल्याने चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...